Download App

Sameer Wankhede : ‘जीवे मारण्याच्या धमक्या, माझा अतिक अहमद होऊ शकतो’; वानखेडेंच्या दाव्याने खळबळ

Sameer Wankhede : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची सध्या सीबीआय (CBI) चौकशी करत आहे. सीबीआयने त्यांच्याशी संबंधित काही ठिकाणी छापे टाकले असून त्यांचाही तपास केला जात आहे. आर्यन खान (Aryan Khan) अटक प्रकरणात समीर वानखेडेंवर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळं त्यांची चौकशी सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर समीर वानखेडे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना मोठा खळबळजनक दावा केला. आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे सांगत अतिक अहमदसारखी घटना माझ्यासोबतही घडू शकते, असं त्यांनी सांगितलं. (Threat to Sameer Wankhede’s life, possibility to demand special security from Mumbai Police Commissioner)

समीर वानखेडे यांच्यावर ड्रग्ज प्रकरणाच्या नावाखाली सेलिब्रिटींकडून खंडणी उकळल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळं वानखेडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेंची चौकशी सुरू आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. या संदर्भात सीबीआय गेल्या दोन दिवसांपासून त्याची चौकशी करत आहे. याबाबत विचारणा केली असता, जे कायदेशीर आहे ते मी न्यायालयाला सांगेन, असं वानखेडेंनी सांगितलं.

Jayant Patil ईडी चौकशीसाठी रवाना, कार्यकर्त्यांना केलं मुंबईत न येण्याचं आवाहन

दरम्यान, समीर वानखेडे तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप सीबीआय करत आहे. या संदर्भात करण्यात आलेल्या दाव्यांवर जोरदार प्रत्युत्तर देताना समीर वानखेडे यांनी सीबीआयला खोचक शुभेच्छा दिल्या. वानखेडे म्हणाले, सीबीआयला आपली बाजू मांडू द्या, त्यांना माझ्या शुभेच्छा.

आर्यन खान प्रकरणातील 25 कोटींच्या खंडणीच्या आरोपांबाबत समीर वानखेडे म्हणतात, “सर्वांनी या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आयोगाने या खोट्या तक्रारींवर स्थगिती आहे. हे कसे घडले ते मला समजत नाही. मात्र माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, असे समीर वानखेडे म्हणाले.

दरम्यान, सोशल मीडियावरून आपल्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा समीर वानखेडेंने केला आहे. सुरक्षेबाबत पोलिसांना आधीच माहिती दिली आहे. सोशल मीडियावर सतत धमक्या येतच आहेत. मी त्यावर साहेबांशी चर्चा करेन, असं ते म्हणाले. अतिक अहमदसारखी घटना तुमच्याही बाबतीत घडू शकते का? असा प्रश्न् विचारल्यावर वानखेडे म्हणाले, धमक्यांचे सत्र तर अव्याहत सुरू आहे. सोशल मीडियावर या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळं धोका आहे. सुरक्षेचं बघू आपण. सुरक्षेचा मुद्दा तर आहेच. जे आहे, ते सीबी साहेबांना पत्राद्वारे आम्ही कळवू, असं ते म्हणाले. त्यामुळे समीर वानखेडे आता मुंबई पोलिस आयुक्तांकडे विशेष सुरक्षेची मागणी करणार असल्याचं समजतं.

Tags

follow us