Jayant Patil यांची आज ईडी चौकशी : राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक
Jayant Patil ED Notice : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आले आहेत. ईडीकडून त्यांना आयएल आणि एफएलएस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. पहिल्यांदा नोटीस पाठवण्यात आल्यानंतर कौटुंबिक कारणास्तव त्यांनी चौकशीसाठी वेळ मागवून घेतला. मात्र त्यानंतर ईडीने त्यांना दुसरे समन्स पाठविले.
आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 22, 2023
यामध्ये आता त्यांना आज सोमवारी 22 मे ला चौकशाचे आदेश देण्यात आले आहेत. ही नोटीसमध्ये जयंत पाटलांना ईडीची ही नोटीस आय एल अॅंड एफ एस या प्रकरणावर आली आहे. दरम्यान त्यांना या अगोदर देखील चौकशीला हजर राहण्याचे आदेश यामध्ये देण्यात आले होते. मात्र आज अखेर जयंत पाटील चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे. त्यानंतर आता ते ईडी चौकशीसाठी रवाना देखील झाले आहेत.
Kushal Badrike: ‘तू परत येशील तेंव्हा…’ अमेरिकेला निघालेल्या बायकोसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट
या ट्विटमध्ये जयंत पाटील म्हणाले की, ‘आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे.’
निवेदन द्यायला आलेल्या शेतकऱ्यांकडे रोहित पवारांनी केलं दुर्लक्ष, व्हिडिओ होतोय व्हायरल
त्याचबरोबर त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचं आवाहन देखील केलं आहे. ते म्हणाले, ‘माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे कि कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे.’ मात्र या पूर्वीच राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी या ईडी चौकशी विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
Election Voting Ink : बोगस मतदान रोखण्यासाठी शाईऐवजी होणार लेझर चिन्हाचा वापर
आयएल अॅंड एएसकडून एका कंपनीने कर्ज घेतलं होत. या कंपनीचं कनेक्शन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी असल्याचं बोललं जात आहे. याच कारणामुळे त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. या कंपनीने 2019 मध्ये दिवाळखोरी जाहीर केली होती. तर लोकांच्या पैशांचं मनि लॉन्ड्रींग केल्याचा आरोप आहे. तर याच प्रकरणात राज ठाकरे यांची देखील चौकशी झाली होती.