Kushal Badrike: ‘तू परत येशील तेव्हा…’ अमेरिकेला निघालेल्या बायकोसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट
Kushal Badrike: मराठी मनोरंजन सृष्टीतील विनोदी अभिनेता कुशल बद्रिकेच्या (Kushal Badrike) सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच चर्चेत राहतो. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या विनोदी कार्यक्रमातून त्याने महाराष्ट्रातील (Maharashtra) घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. कुशलला मनोरंजन क्षेत्रामध्ये येण्यासाठी खूपच मेहनत करावी लागली आहे.
View this post on Instagram
कुशल बद्रिकेची पोस्ट
“यार सुनयना,
तू काय बाबा आता “अमेरिकेला” जाणार, “मुघल ए आजम” मधे, डांस बिंस करणार, पिझ्झा बर्गर खाणार , झ्याक-प्याक राहणार..
जायचं आहे तर जा, “आमाला काय…. बाबा”
खरंतर एवढे दिवस तुझ्यावाचून राहायची सवय नाही ना “घराला” म्हणून जरा काळजाला “घरं” पडल्या सारखं झालंय बस.
बाकी तू परत येशील तेंव्हां…..
हा ऋतू बदलला असेल, पाऊस, “कुणीतरी पाणी शिंपडावा” एवढाच् उरला असेल, शाळेत मुलांचे वर्ग आणि मित्र बदललेले असतील, “मनुची” हाफ पँट जाऊन फुल पँट आली असेल, “गंधूची” परीक्षा जवळ आल्यामुळे अख्ख घर अंडरप्रेशर असेल,
काय गंमत आहे बघ, कधी काळी, “आपलं सुद्धा एक घर असेल”, अशी स्वप्नं पापण्यांत घेऊन, आपण घराच्या वाटेकडे डोळे लाऊन बसायचो, आता “तुझ्या” वाटेकडे “आपलं घर” डोळे लाऊन बसेल….
आणि मी………..
मी, छोट्टीशी खोली होऊन जाईन त्या घरातली, नुसत्या भिंतींची…. तुझ्या वाचून रिकामी………. (सुकून)
तळ टिप:- तुला संधी देणाऱ्यांचे मनापासून आभार
आणि मुघलांनी अमेरिके वर कधीच राज्य केलं नाही, पण “मुघल ए आजम” ह्या तुमच्या कार्यक्रमाने अख्खी अमेरिका जिंकावी ह्या सगळ्यांना शुभेच्छा”, अशी पोस्ट त्याने केली आहे.
सध्या या नाटकाची टीम ही अमेरिका दौऱ्यासाठी निघाली आहे. त्यानिमित्ताने कुशलने सुनयनासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याद्वारे त्याने तिला अतिशय रंजक शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांनी ‘मुघल-ए-आझम’ या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकात मराठमोळी अभिनेत्री प्रियंका बर्वे ही अनारकली हे पात्र करत असल्याचे समजलं आहे. तर सुनयना ही या नाटकात काम करताना दिसून येणार आहे.