Three Accused Arrested For Creating Terror By Firing In Shirdi : मागील काही दिवसांपासून शिर्डीत गुन्हेगारीच्या घटनांचा आलेख वाढलाय. शिर्डीमध्ये (Shirdi) नुकतेच 48 तासांत तीन खून झाल्याच्या घटना घडल्या. आता पुन्हा शिर्डीमध्ये गावठी कट्ट्यातून हवेत फायरिंग केल्याची घटना घडली. यामुळं तेथे मोठं दहशतीचं वातावरण (Shirdi Crime) होतं. या्प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात (Firing In Shirdi) आलीय. त्यांच्याकडून 3 गावठी कट्ट्यांसह दोन लाख 70 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलीय.
सगळं मावळलेलं असताना तुम्ही शिवसेना…ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंच्या शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले होते. गुप्त माहिती मिळाली होती की, शिर्डीतील गणेश आप्पासाहेब शेजवळ याच्याकडे अग्नीशस्त्र (Crime News) आहे. त्याने दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार केला होता. या गोळीबाराचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये असल्याची देखील माहिती मिळाली होती. यासंदर्भात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी पथक तयार केले. संशयितांची माहिती घेवून पडताळणी करून कारवाई संदर्भात त्यांना सूचना देवून रवाना केले.
तपास पथक शोध घेत असताना त्यांनी गणेश शेजवळ या आरबीएल चौकाजवळ सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. तेव्हा त्याने त्याने मोबाईलमध्ये अग्निशस्त्रचा व्हिडीओ दाखवला. तसेच ते चुलत भाऊ अजय शेजवळकडे ठेवलं असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पोलीसांनी त्यांच्या घरातून एक लाख वीस हजार किमतीचे दोन मोबाईल. तसेच 3 गावठी पिस्टल, 3 जिवंत काडतुसे आणि 3 रिकाम्या काडतुसाच्या पुंगळ्या जप्त केल्यात.
अहिल्यानगरमधील रनर्सच्या महाकुंभात धावले दोन हजार धावक, दिव्यांग अन् राजकीय व्यक्तींचाही सहभाग
आरोपींनी हवेत गोळीबार केल्याची कबुली दिलीय. पिस्टल विक्री करणाऱ्यांमध्ये रोशन कोते हा पोलिसांच्या हाती लागलाय. तर बाकीच्या फरार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत शोध घेण्यात येत आहे. आरोपींविरूध्द शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्यांचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहेत. ही कारवाई मा. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, आणि मा. शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांच्या सुचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अन् अंमलदार यांनी केलीय.