आजपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुनावणी

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणारंय. शिंदे गटाकडून (Shinde Group) युक्तिवाद करण्यात येणारंय. ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे(Harish Salve), अ‍ॅड. नीरज किशन कौल (Niraj Kishan kaul), अ‍ॅड. मनिंदर सिंग (Maninder Singh)शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत. शिवाय अ‍ॅड. महेश जेठमलानीही (Mahesh Jethmalani)शिंदे गटाकडून असतील. तर राज्यपालांकडून महाधिवक्ते तुषार मेहता (Tushar Mehta)युक्तिवाद करणार आहेत. आजपासून राज्यातील सत्तासंघर्षावर […]

Supreme Court

Supreme Court

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणारंय. शिंदे गटाकडून (Shinde Group) युक्तिवाद करण्यात येणारंय. ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे(Harish Salve), अ‍ॅड. नीरज किशन कौल (Niraj Kishan kaul), अ‍ॅड. मनिंदर सिंग (Maninder Singh)शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत. शिवाय अ‍ॅड. महेश जेठमलानीही (Mahesh Jethmalani)शिंदे गटाकडून असतील. तर राज्यपालांकडून महाधिवक्ते तुषार मेहता (Tushar Mehta)युक्तिवाद करणार आहेत. आजपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुनावणी होणारंय.

यापूर्वीच्या सुनावणीत राज्यपालांच्या नैतिकतेवर आणि अधिकारांवर ठाकरे गटानं युक्तिवाद केला होता. तर महाविकास आघाडी आणि पर्यायानं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेलं असतं तर 39 मतांनी फरक पडला असता असं निरिक्षण कोर्टानं नोंदवला होता.
ठाकरे गटानं (Thackeray Group)गेल्या सुनावणीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आज शिंदे गट आपली बाजू मांडणारंय.

Ravindra Dhangekar यांच्या विजयाचे फ्लेक्स दोन तासातच काढले!

आज ठाकरे गटाकडून उर्वरित युक्तिवाद होणारंय. आजपासून पुढचे सलग तीन दिवस खंडपीठासमोर सुनावणी पार पडणारंय. आज ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत बाजू मांडणार आहेत. त्यानंतर शिंदे गटाच्यावतीने जेष्ठ वकिल हरिश साळवे बाजू मांडतील.

Exit mobile version