Sunetra Pawar Elected As Party Leader Of NCP : अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आज (दि.31) सुनेत्रा पवार यांची एकमताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सुनेत्रा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर, या प्रस्तावाला पक्षातील अन्य नेत्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. मात्र, विधीमंडलात पार पडलेल्या पक्षाच्या या बैठकीत जो ठराव मांडण्यात आला त्या पत्राची पत्र समोर आली आहे. ज्यात तीन सदस्यांच्या सह्याच नसल्याचे समोर आलं आहे. या सह्या नेमक्या का करण्यात आलेल्या नाहीत याचे कारण समोर आलेले नाही. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपदही होते. आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपद आपल्याकडेच ठेवणार की दुसऱ्या नेत्याकडे ही जबाबदारी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कुणाकुणाच्या सह्या मिसिंग?
सुनेत्रा पवार यांची गटनेतीपदी निवड झालेल्या पत्रावर एकूण 48 सदस्यांची नावे आहेत. मात्र, यात अहेरीचे आमदार धर्मरावबाब अत्राम, शहापूरचे दौलत दरोडा आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची सही नसल्याचे स्पष्ट होत आहे. सह्यांचे हे पत्र घेऊन पक्षातील नेते मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी गेले आहे. यानंतर आता फडणवीसांकडून शपथविधीसाठी राज्यपालांकडे पाठवले जाणार आहे.
राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. सुनेत्रा पवार यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली होती. मात्र आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने त्यांना खासदारकी सोडावी लागणार होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.
शरद पवार सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला हजर राहणार? पार्थ पवारांचा मनधरणीचा प्रयत्न
या शपथविधीबाबत मला काहीच माहिती नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केल्याने एकच खळबळ उडाली आहे.सुनेत्रा पवार शपथ घेणार असतील, तर तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. पटेल आणि तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. याबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही असं पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) गोविंद बागेत शरद पवार यांच्या मनधरणीसाठी दाखल झाले होते. समोर आलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांनी शरद पवार यांना आज संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या शपथविधीला हजर राहण्याचे आमंत्रण दिले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चानंतर आता शरद पवार सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला हजर राहणार का? याबाबत सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे.
सह्यांचे पत्र वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
