हत्या नव्हे, केवळ घाबरवण्याचा उद्देश…टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात शूटरचा कथित दावा!

टायर श्रॉफ गोळीबार प्रकरणा मोठा खुलासा समोर आला असून गोळीबार हत्येसाठी नव्हे तर दहशत निर्माण करण्याचा उद्देश असल्याचा दावा करण्यात आलायं.

Tiger Shrof

Tiger Shrof

Tiger Shroff Firing : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार (Tiger Shroff Firing) झाल्याची घटना घडली. त्यानंतर पोलिसांकडून आरोपींना अटकही करण्यात आली. अटकेनंतर या प्रकरणात मोठे खुलासे समोर येत आहेत. क्राईम ब्रॅंचला दिलेल्या कथित जबाबात आरोपींनी गोळीबार हत्या करण्यासाठी नाही तर केवळ घाबरवण्याचा, दहशत निर्माण करण्याचा उद्देश असल्याचा दावा केला आहे. हत्या करायीच असते तर सामने सुरु असतानाच हत्या केली असते, असाही दावा आरोपींनी कथित जबाबात केल्याचा मोठा खुलासा आरोपी फुलसिंग आणि रेहानने केलायं.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात बॉलीवूडमध्ये दहशत निर्माण करण्याासाठीच गोळीबार केल्याचा कथित दावा आरोपी फुलसिंग आणि रेहान याने केलाय. टायगर श्रॉफ फुटबॉल सामने खेळक असताना आम्ही त्यांच्या अगदी जवळ होतो, तेव्हा ते स्पष्टपणे दिसत होते त्यांच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षकही नव्हते. आमचा हत्या करण्याचा उद्देश असता, तर फुटबॉल सामना खेळत असतानाच हल्ला केला असता, असा कथित युक्तिवाद आरोपींनी कथित जबाबात केलायं.

आरोपींकडून करण्यात आलेल्या कथित दाव्याची क्राईम ब्रांचकडून पडताळणी केली जात आहे. तसेच टायगर श्रॉफवर गोळीबारामागचा नेमका उद्देश काय होता?
घाबरवण्यासाठीच गोळीबार करण्यास कोणी सांगितलं? कथित कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास सुरु आहे. मुंबईत आल्यानंतर आरोपींनी बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने टायगर श्रॉफवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आरोपींनी त्याच्या आणि चाहत्यांच्या इन्स्टाग्रामवरील रील्सचा आधार घेतला. टायगर श्रॉफसोबत पोलीस बंदोबस्त नसल्याचं सोशल मीडियावरील व्हिडिओंमधून लक्षात आल्याने त्याला लक्ष्य केल्याचं आरोपींनी सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून, त्यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. मुंबईत येण्यापूर्वीच दुसऱ्या व्यक्तीला लक्ष्य करण्याचा कट आखण्यात आला होता, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, नियोजित व्यक्तीपर्यंत पोहोचणं शक्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपींनी टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचं ठरवल्याची माहिती पुढे आली आहे.

Exit mobile version