Navnath Ban On Sanjay Raut : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तर आता या टिकेला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
माध्यमांशी बोलताना नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहेत. महाविकास आघाडी (MVA) सरकार असताना जंगलराज होतं हे ते विसरलेत का? पोलिसांमार्फत गुंडगिरी केली जात होती. पालघरमध्ये दोन साधुंची मॉब लिंचिंग झाली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) होते. सुशांत सिंग राजपूत , दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणात तिचे वडील अजून न्याय मागत आहेत. सचिन वाझेने पोलिसांमार्फत एका उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्ब प्लांट केला होता. तो आरोप मुख्यमंत्र्यांवर झाला तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी होती अशी टीका नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
पुढे बोलताना नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले की, गृहमंत्री म्हणून सक्षमपणे ते सरकार चालवण्याचे काम करत आहेत. तुमचे गृहमंत्री जेलमध्ये गेले होते हे विसरु नका. गृहमंत्र्यांच्या वापर विरोधकांना संपवण्यासाठी कसा करतात हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना पाहिले. नितेश राणे, प्रविण दरेकर यांना अटक केली होती असं देखील नवनाथ बन म्हणाले. तसेच फडणवीस सरकारमध्ये एक बोट दाखवणारे तुम्ही चार बोटे तुमच्याकडे आहेत हे विसरु नका असेही यावेळी बन म्हणाले.
टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरण, राजस्थानमध्ये मोठी कारवाई; तीन संशयितांना अटक-
जामीनावर असलेले लोक राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह बोलले – चंद्रशेखर बावनकुळे
जामीनावर असलेले लोक राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह बोलले. संजय राऊत यांनी साईज बघून बोलावे. देशातील महत्त्वाच्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वाचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची गणना होते. त्यांना संजय राऊत यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही तर राज्याने त्यांना प्रमाणपत्र दिलं आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
