रक्तदात्यांना टायटनची घड्याळं, मुंबईत तीन रक्तकेंद्रांचे एफडीएकडून थेट परवाने निलंबित

FDA directly suspends licenses blood centers रक्तदात्यांना घड्याळे भेट म्हणून दिल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाची मुंबईतील तीन रक्तकेंद्रांवर कारवाई

FDA Directly Suspends Licenses Blood Centers

FDA Directly Suspends Licenses Blood Centers

Titan watches for blood donors FDA directly suspends licenses of three blood centers in Mumbai : रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यास प्रतिबंध असतानाही मुंबईत आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना टायटन कंपनीची घड्याळे भेट म्हणून दिल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील तीन रक्तकेंद्रांवर कारवाई केली आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद (NBTC) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मे. इंडियन रेड क्रॉस सोसायटी रक्तकेंद्र, मुंबई; डीन ग्रँट मेडिकल कॉलेज व सर जे. जे. समूह रुग्णालय रक्तकेंद्र, भायखळा, मुंबई; आणि बी. वाय. एल. नायर चॅरिटेबल हॉस्पिटल रक्तकेंद्र, मुंबई सेंट्रल, मुंबई या तीन रक्तकेंद्रांचे थेट परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

एप्रिल 2026 च्या सुमारास मुंबईतील स्टार कमिटी, अल्टामाउंट रोड यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या जाहिरातीमध्ये रक्तदात्यांना टायटन कंपनीचे घड्याळ भेट म्हणून देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद (NBTC) यांच्या ऐच्छिक रक्तदानासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ऐच्छिक रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदात्यांना कोणत्याही प्रकारची भेटवस्तू देण्यास मनाई आहे. सुरुवातीला रक्तदान शिबिराच्या आयोजकांनी आणि सहभागी रक्तपेढ्यांनी भेटवस्तूंच्या वाटपाबाबत अनभिज्ञता दर्शवली होती. मात्र, तपासणीदरम्यान काही रक्तदात्यांशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांना घड्याळे भेट म्हणून मिळाल्याचे स्पष्ट झाले.

तपासणीनंतर रक्तकेंद्रांचे परवाने निलंबित

या प्रकरणी संबंधित रक्तकेंद्रांची 22 ऑगस्ट 2026 रोजी तपासणी करण्यात आली. तपासणीत आढळलेल्या त्रुटींबाबत 2 सप्टेंबर 2026 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर 22 सप्टेंबर 2026 रोजी संबंधित रक्तकेंद्रांची वैयक्तिक सुनावणी घेण्यात आली. रक्तकेंद्रांनी सादर केलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने औषधे व सौंदर्य प्रसाधने नियमानुसार परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.

मराठवाडा पदवीधर आणि सतीश चव्हाण हे समीकरण कसं झालं?, राजकीय साथीदार बदलले तरी चौथ्यांदा विजयाचा विश्वास कसा?

दरम्यान, डीन ग्रँट मेडिकल कॉलेज व सर जे. जे. समूह रुग्णालय रक्तकेंद्र तसेच बी. वाय. एल. नायर चॅरिटेबल हॉस्पिटल रक्तकेंद्र यांनी निलंबनाच्या आदेशांविरोधात शासनाकडे अपील दाखल केले आहे. त्यांना निलंबनाच्या आदेशांवर तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.

अहिल्यानगरच्या प्रसिद्ध हॉटेल संदीप, सचिनसह कोतकरांच्या निवासस्थानावर छापे? नेमकं कारण काय?

रक्तदानासाठी भेटवस्तू किंवा प्रलोभनांचा वापर नको अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “रक्तदान ही सामाजिक बांधिलकी आणि मानवतेच्या सेवेशी संबंधित महत्त्वाची प्रक्रिया आहे. रक्तदानासाठी कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू किंवा प्रलोभनांचा वापर होऊ नये, तसेच संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन कटिबद्ध आहे. रक्तपेढ्यांनी लागू असलेल्या कायदेशीर तरतुदी आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे.

 

Exit mobile version