Download App

रुफ टॉप सोलरच्या घरगुती ग्राहकांना दिलासा! सोलर ग्राहकांना TOD पद्धत लागू होणार नाही

rooftop solar घरगुती ग्राहकाला स्मार्ट मिटर / स्मार्ट नेट मिटर लावला तरी TOD meter प्रमाणे बिल लावण्यावर आक्षेप घेण्यात आला होता.

TOD method will not be applicable to rooftop solar domestic customers : केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सोलर सिस्टीम बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र घरगुती ग्राहकाला स्मार्ट मिटर / स्मार्ट नेट मिटर लावला तरी TOD meter प्रमाणे बिल लावले जाणार असल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र अखेर वीज नियामक आयोगाने हा निर्णय मागे घेत रुफ टॉप सोलरच्या घरगुती ग्राहकांना दिलासा दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सोलर सिस्टीम बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यातील मूळ संकल्पना म्हणजे ही सोलर सिस्टीम बसवलेल्या ग्राहकांच्या घरात दिवसभर जेवढे युनिट वीज सूर्यप्रकाशामुळे तयार होईल. ती त्यांनी महावितरणच्या ग्रीडमध्ये टाकायची आणि ग्राहक दिवसरात्र मिळून जेवढे युनिट वीज वापरेल ती तयार केलेल्या युनिटमधून वजा करुन फक्त उर्वरीत युनिटचे पैसे भरायचे.

1 एप्रिलपासून प्रीमियम हॉटेल्समध्ये जेवण महागणार, द्यावं लागणार 18% GST

जर तयार केलेली वीज वापरलेल्या वीजेपेक्षा जास्त असेल तर तेवढे युनिट ग्राहकाच्या खात्यात जमा राहतील व ते आर्थिक वर्ष संपेपर्यंत त्या युनिटसचा वापर तो करु शकेल व वर्षाअखेर जे युनिट्स त्यांच्या खात्यात जास्तीचे शिल्लक राहतील त्यांचे महावितरण ग्राहकाला पैसे देईल.‌ ही यंत्रणा सुरळीत राबवण्यासाठी नेट मीटर बसवण्यात येतात. आजवर घरगुती ग्राहकांना हे मीटर्स स्मार्ट मिटर नव्हते. मात्र आता महावितरणच सर्व ग्राहकांना स्मार्ट नेट मीटर बसवणार आहे जे TOD meters असणार आहेत. रुफटॉप रेग्युलेशन्स 2019 च्या 11.4 ( d) प्रमाणे TOD net meters असलेल्या ग्राहकांना दिवसाच्या ज्या काळात ( म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 5) सोलर सिस्टीम मधून वीज तयार केली गेली असेल त्याच काळात वापरलेल्या युनिट्स बरोबर वजाबाकी होईल आणि या काळात जी जास्तीची वीज तयार होईल ती off peak काळात तयार झालेली वीज म्हणून धरली जाईल.

मी मुलांना स्वीकारतो मात्र करुणा शर्मा यांच्याशी माझं लग्नच…धनंजय मुंडेंचा पोटगीच्या याचिकेत मोठा दावा

अर्थातच peak hours मध्ये त्याचा setoff मिळणार नाही. मुळातच सोलर मधून वीज फक्त दिवसा 9 ते 5 या वेळेतच तयार होते तर घरगुती ग्राहकांचा वीजवापर प्रामुख्याने संध्याकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत असतो, त्यामुळे त्याला आता या TOD meters मुळे set off मिळणार नाही. आत्ता महावितरणने नुकत्याच सादर केलेल्या वीजदरवाढ प्रस्तावात off peak hours म्हणून सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ही वेळ ठरवली आहे. त्यामुळे या काळातच तयार झालेली सोलर वीज त्याच काळात वापरली नाही तर ती फक्त खात्यात दिसत राहील व वर्षाचे शेवटी तेवढ्या युनिट्स च्या 88% युनिट्स चे 3 / 3.50 रुपयांप्रमाणे पैसे मिळतील आणि ग्राहक संध्याकाळी 6 ते सकाळी 9 या मुख्य वेळेत जी वीज वापरेल त्याचे त्याला बिल भरावेच लागेल आणि सोलर सिस्टीम बसवल्यामुळे वीजबिल शून्यावर येण्याचे त्याचे स्वप्न भंग पावेल. यातून ग्राहकांचा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला मिळणारा प्रतिसाद कमी होईल.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, झी न्यूजचे मालक सुभाष चंद्राने मागितली रिया चक्रवर्तीची माफी; कारण काय?

या विरोधात आमच्यासह अनेक ग्राहक संघटनांनी , सोलर सिस्टीम इरेक्टर्संनी खालील मागणी वीज नियामक आयोगाकडे नेटाने लाऊन धरली होती घरगुती ग्राहकाला स्मार्ट मिटर / स्मार्ट नेट मिटर लावला तरी TOD meter प्रमाणे बिल लाऊ नये व आज रोजीची पद्धतच चालू रहावी. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वीज नियामक आयोगाने काल रात्री घोषित केलेल्या पंचवार्षिक वीज दरवाढ प्रस्तावात घरगुती सोलर ग्राहकांना TOD पद्धत लागू होणार नाही व त्यांच्यासाठी आजवरची पद्धतच लागू राहील अशी स्पष्ट तरतूद केली आहे.

follow us

संबंधित बातम्या