सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, झी न्यूजचे मालक सुभाष चंद्राने मागितली रिया चक्रवर्तीची माफी; कारण काय?

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, झी न्यूजचे मालक सुभाष चंद्राने मागितली रिया चक्रवर्तीची माफी; कारण काय?

Rhea Chakraborty : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआयच्या (CBI) क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) झी न्यूजचे मालक सुभाष चंद्रा (Subhash Chandra) यांनी माफी मागितली आहे. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात चुकीची रिपोर्टिंग केल्याने तसेच या प्रकरणात तिला दोषी ठरवल्याने त्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची जाहीर माफी मागितली आहे. तसेच या प्रकरणात रिपोर्टिंग करणारे झी न्यूजवरील सर्व अँकरर्स देखील माफी मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Suicide Case) प्रकरणात झी न्यूजसह भारतीय माध्यमांनी रिया चक्रवर्तीविरुद्ध एक चुकीची मोहिम सुरू केली होती, ज्यामध्ये रियाला या प्रकरणात दोषी ठरवण्याचे काम करण्यात येत होते तसेच रियावर अनेक गंभीर आरोप देखील लावण्यात आले होते. मात्र आता सीबीआयने त्यांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुशांत सिंह राजपूतचा संशयास्पद मृत्यू आत्महत्या असल्याचे मान्य केल्याने सर्व माध्यमांशी रिया चक्रवर्तीची माफी मागावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु होती. तर आता झी न्यूजचे मालक सुभाष चंद्रा यांनी एक्स वर पोस्ट करून रिया चक्रवर्तीची माफी मागितली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. मला वाटते की आता अस्पष्टतेला जागा नाही. असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी आपल्या एक्स वर लिहिले आहे की, मागे वळून पाहताना मला असे वाटते की रियावर मीडियाने आरोप केले होते आणि तेव्हा झी न्यूजने त्यांच्या तत्कालीन पत्रकार आणि संपादकांद्वारे चालवले होते आणि इतरांनी झी न्यूजला फॉलो केले मात्र आता झी न्यूजचा मार्गदर्शक म्हणून, मी त्यांना धाडस दाखवण्यास आणि माफी मागण्यास सांगेन. यात माझी कोणतीही भूमिका नसली तरी मी रियाची माफी मागतो. असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात भारतीय माध्यमांमध्ये या विषयावर सतत वृत्तांकन सुरू होते आणि असा दावा केला जात होता की सुशांतने आत्महत्या केली नाही तर त्याची हत्या करण्यात आली आहे.

पाकिस्तानला पुन्हा धक्का, पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा शानदार विजय

सुशांतच्या हत्येमागे एक मोठे कट रचले गेले आहे, ज्यामध्ये रिया चक्रवर्तीसह बॉलिवूड आणि राजकारणातील मोठे लोक सामील आहेत. असा दावा करण्यात येत होता. मात्र आता सीबीआयने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे आणि सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या मानले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube