राज्यभरात गुटखा विक्री करणारे 49 जण अटकेत; पावणे दोन कोटींचा साठा जप्त

Tukaram Munde: राज्यात 103 हॉटेल, रेस्टारंट, धाबा इत्यादीची तपासणी करून 34 आस्थापनांना सुधारीत नोटीस देण्यात आल्या आहेत.

FDA ACTION Tukaram Munde

FDA ACTION Tukaram Munde

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त (FDA) तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांच्या आदेशाने राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध छापा सत्र सुरू आहे. गेल्या चार दिवसांत राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत दूध व दुग्धजन्य पदार्थ्यांवर एफडीएने मोठी कारवाई केलीय. दीड लाख रुपयांचे पावणे दोनशे लीटर दूध जप्त करण्यात आले आहे.

पानमसाला, गुटखा विक्री, वितरण वाहतूक करणाऱ्या 49 व्यक्तींना अटक करण्यात आली असून, 1 कोटी 80 लाख रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आलाय. तर अन्नपदार्थांचा सुमारे 5 लाख 56 हजार रुपये किंमती 2798 किलो साठा जप्त करण्यात आला आहे.

16 हॉटेलचे परवाने निलंबित
राज्यात 103 हॉटेल, रेस्टारंट, धाबा इत्यादीची तपासणी करून 34 आस्थापनांना सुधारीत नोटीस देण्यात आल्या आहेत. तर 16 अन्न आस्थापनाचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. राज्यात 53 धाडी टाकण्यात आल्या असून, कारवाईत 1 कोटी 85 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

कुठे-कुठे कारवाई ?
गोवंडी येथील सुफी डेअरीमधून 1683 लिटर दूध जप्त करण्यात आले आहेत. येथे तपासणीत दुधाच्या साठवणुकीबाबत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले आहे. लातूरमधील रेणापूर येथे बेंगलोर अय्यंगार बेकरी येथून 2700 रुपये किंमतीचा मावा जप्त करण्यात आला आहे. तर बीडमधील मोची पिंपळगाव येथे दूध विक्रेतावर कारवाई करण्यात आली आहे. नोंदणीविना दूध विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर धाराशिव येथील पारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आळ्या आढळून आलेल्या निकृष्ट दर्जाचा 5940 नगर सोयाबीन वडी जप्त करून तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. सिन्नर येथील लक्ष्मी दूध, साईन दूध सेंटर कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यात स्टार केटरिंग सर्व्हिसवर कारवाई
अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील मंगळवार पेठ येथील स्टार केटरिंग सर्व्हिसवर कारवाई केली आहे. या केटरिंगमध्ये अस्वच्छता आढळून आली आहे. गोल्डन मॅजेस्टिक बेकरी येवलीवाडी, सिद्धार्थ अॅग्रो डेअरी पारगाव पेठ, आंबेगाव-पुणे, बिकांगे बिर्याणी एलएलपी, बाणेर (पुणे), महाबळेश्वरमधील सह्याद्री रेस्टारंट अॅण्ड धावा, महाबळेश्वरमधील सिगडी रेस्टारंट, सांगलीतील हळद भवन कॅन्टिन, रेड अॅण्ड हस कल्याणीनगर येथे कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version