डायबेटिसच्या मुदतबाह्य गोळ्या दिल्या, थेट तुकाराम मुंढेंकडे तक्रार; आता मेडिकलला थेट टाळे

IAS Tukaram Munde-नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हनुमंत वनाळेकर यांच्याबाबत मुदताबाह्य गोळ्या दिल्याचा प्रकार घडला आहे.

  • Written By: Published:
Tukaram Munde

IAS Tukram Munde : एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (IAS Tukaram Munde) यांनी खाद्यपदार्थमध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध, बंदी असताना गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केलीय. आता औषध विक्रेत्यांवर मुंढे यांनी करडी नजर वळविली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णालयांमध्ये औषधे खरेदी करण्याची सक्ती करू शकत नाही, दुसरीकडून औषधे खरेदी करता येणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी जाहीर केले आहे. आता तर मुदतबाह्य औषधे दिल्याच्या तक्रारीची दखल तुकाराम मुंढे यांनी घेतले आहे. नांदेड जिल्ह्यातील मेडिकलच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने बंद करण्यात आले आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठा बदल; युद्ध थांबण्याची घोषणा होताच उलटफेर


मुलीने गोळ्या बघितल्या अन्

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हनुमंत वनाळेकर यांच्याबाबत मुदताबाह्य गोळ्या दिल्याचा प्रकार घडला आहे. ते आपल्या 85 वर्षीय वडिलांसाठी डायबिटीसच्या गोळ्या घेण्यासाठी शनिवारी डॉक्टर लेन येथे गेले होते. तोष्णीवाल मेडिकलवरून त्यांनी डायबटीस गोळ्यांचे तीन पाकिटे खरेदी केल्या होत्या.घरी गेल्यानंतर हनुमंत वनाळेकर यांच्या मुलीने गोळ्यांची मुदत पाहिले. गोळ्यांची मुदत डिसेंबर 2025 रोजीच संपलेली होती. ही बाब समजल्यानंतर हनुमंत वनाळेकर यांनी थेट तुकाराम मुंडे यांना मेल केला. तोष्णीवाल मेडिकलकडून डायबिटीसच्या मुदतबाह्य गोळ्यांची विक्री केली जात असल्याची तक्रार त्या मेल होते.


दिल्ली जिमखाना क्लबनंतर जयपूर पोलो ग्राउंडचाही केंद्राकडे ताबा; मोक्याची जागा सरकार का घेतंय ?


तुकाराम मुंढेंकडून लगेच अॅक्शन

मेल तपासला गेला आणि तक्रार प्राप्त होताच मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर सोमवारी तक्रारदार वनाळेकर पुन्हा मेडिकलवर जाऊन डायबिटिसच्या गोळ्या खरेदी केल्या. त्यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाचे नांदेड सहायक आयुक्त अशोक राठोड हेही त्यांच्याबरोबर होते. तेव्ही मुदतबाह्य गोळ्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून दोन तास चौकशी करून गोळ्या जप्त केल्या. शिवाय मेडिकल बंद ठेवण्याचे आदेश दिलेत.

follow us