Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची न्यूयॉर्क टाईम्समध्ये दखल; ‘रॉकस्टार’ म्हणत केलं कौतुक

Tukaram Mundhe : अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या निर्णयांमुळे केवळ राज्यातच नाहीतर संपूर्ण देशात सध्या चर्चेत आहे.

Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

Tukaram Mundhe : अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या निर्णयांमुळे केवळ राज्यातच नाहीतर संपूर्ण देशात सध्या चर्चेत आहे. अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्तपद स्वीकारताच त्यांनी राज्यातील अनेक रेस्टॉरंट, गोदामे, हॉटेलवर कारवाई करत लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करत परवाने रद्द केले आहे. तर आता त्यांच्या कामाची चर्चा थेट अमेरिकत होत आहे. अमेरिकेतील ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राने त्यांच्याबद्दलचे वृत्त पहिल्या पानावर प्रसिद्ध केले आहे. इन इंडिया, अ फूड इन्स्पेक्टर इज अ रॉकस्टार या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तात, तुकाराम मुंढे यांच्या कामाबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या अचानक केलेल्या तपासणी मोहिमांमुळे ते सामान्य जनतेत लोकप्रिय झाले आहेत आणि अन्न स्वच्छतेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा बनला आहे, यावर या वृत्तात प्रकाश टाकण्यात आला आहे.

तर दुसरीकडे तुकाराम मुंढे राज्यात ‘आयएएस सिंघम’ या नावाने देखील ओळखले जातात. आपल्या कामामुळे तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) सोशल मीडियावर चर्चेत राहतात. त्यांनी अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त पद स्वीकारल्यापासून राज्यात एफडीएने (FDA) रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थांची दुकाने, गोदामे आणि ‘क्विक-कॉमर्स’ क्षेत्रातील ‘डार्क स्टोअर्स’वर कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्दे माल जप्त केला आहे. तर अनेकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे.

सुशासन म्हणजे बदल घडवून आणणे

आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात (The New York Times) प्रकाशित झालेल्या या वृत्तावर तुकाराम मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, सुशासन म्हणजे केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहणे नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर ठोस बदल घडवून आणणे होय. अन्न सुरक्षेचा खरा उद्देश हा जीव वाचवणे, नियमांचे पालन सुनिश्चित करणे आणि लोकांचा विश्वास टिकवून ठेवणे हाच आहे, यावर त्यांनी भर दिला.

मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, होणार चार नव्या मंत्र्यांचा समावेश-

जेव्हा कायद्याची अंमलबजावणी निष्पक्षपणे, निर्भयपणे आणि सातत्याने केली जाते, तेव्हा संस्थांची विश्वासार्हता वाढते आणि नागरिकांचा व्यवस्थेवर विश्वास बसू लागतो. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ ने महाराष्ट्रातील हीच सत्य घटना जगासमोर मांडली आहे.

Exit mobile version