Tukaram Mundhe will Strict action taken if patients are compelled to purchase medicines from hospitals pharmacies : प्रशासनातील धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंडे यांची राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडका लावला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी आता रूग्णालयांतील औषध विभागांकडे आपला मोर्चा वळवला आहे.
रूग्णालयांच्या फार्मसीतून औषधं घेण्याचं बंधन केल्यास कडक कारवाई…
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश दिले आहेत की, जे रूग्णालयं रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्याच फार्मसीतून औषधं घेणं बंधनकारक करतील त्यांच्यावर थेट कडक कारवाई केली जाईल. कारण कोणत्याही कायद्याने ज्या रूग्णालयात रूग्ण उपचार घेत आहे. तेथूनच औषधं खरेदी करणं बंधनकारक नाही. त्यामुळे रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना औषधं कुठून खरेदी करायची याचा अधिकार त्यांचा त्यांना आहे. असं आढळून आल्यास कारवाईचा थेट इशारा मुंढे यांनी दिला आहे.
अखेर, शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळेंची माघार; जळगाव विधान परिषदेतील महायुतीतील तिढा सुटला!
दरम्यान याअगोदरच मुंढे यांनी गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध वापाराला प्रतिबंध घालण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाकडून हे मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. केवळ विक्रेतेच नव्हे तर उत्पादक, पुरवठादार,वाहतूकदारांवरही कारवाई होणार आहे. यामधून कोणाचीही सुटका होणार नाही, असा इशाराच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. गोदाम चालक आणि घाऊक तसेच किरकोळ विक्रेतेही एफडीएच्या रडावर असणार आहेत.
