अखेर, शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळेंची माघार; जळगाव विधान परिषदेतील महायुतीतील तिढा सुटला!
Jalgaon Legislative Council मधील महायुतीतील तिढा अखेर सुटला आहे. कारण शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंनी अखेर माघार घेतली आहे.
Shiv Senas Rebel Reshma Kale withdraws Mahayuti’s deadlock Jalgaon Legislative Council seat resolved : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात (Election) एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमधील महायुतीतील बंडखोरीचा तिढा यशस्वीपणे सोडवल्यानंतर नाशिकपाठोपाठ जळगावचाही पेच सुटला आहे.कारण शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंनी अखेर माघार घेतली आहे.
रेश्मा काळे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच आपली भूमिका आक्रमक ठेवली होती. नाशिकमधील गुंतागुंतीमुळे आपल्याला जळगावातून उमेदवारी अर्ज भरावा लागला. जर नाशिकच्या बंडखोरांनी माघार घेतली, तर आपणही विचार करू, असे संकेत त्यांनी सुरुवातीला दिले होते. त्यानंतर अखेर या सगळ्या लोकांच्या भावनांचा आदर ठेवून आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचं म्हणत त्यांनी माघार घेतली आहे.
मुंढेंचा मोर्चा औषधांकडे! रूग्णालयांच्या फार्मसीतून औषधं घेण्याचं बंधन केल्यास कडक कारवाई
जळगाव विधान परिषद मतदारसंघात महायुतीने भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी अपक्ष बंडखोरी केल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र अखेर नाशिकमधील महायुतीतील बंडखोरीचा तिढा यशस्वीपणे सोडवल्यानंतर नाशिकपाठोपाठ जळगावचाही पेच सुटला आहे.कारण शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंनी अखेर माघार घेतली आहे.