काशीद बीचवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू; अकोल्यातील विद्यार्थी सहलीला गेले असता घडली दुर्घटना

Kashid Beach कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध अशा काशीद बीचवर एक दुर्घटना घडल्याचा समोर आलं आहे.

Kashid Beach

Kashid Beach

Two die after drowning in the sea at Kashid Beach; Accident occurred when students from Akola went on a trip : कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध अशा काशीद बीचवर एक दुर्घटना घडल्याचा समोर आलं आहे. या ठिकाणी अकोल्याहून सहलीला आलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या गटातील दोघांचा समुद्रात पडून मृत्यू झाला आहे.

नेमकी घटना काय?

अकोल्याहून शॉरवीन क्लासेसचे विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांसह कोकणातील काशीद बीचवर सहलीसाठी गेले होते. यावेळी समुद्रकिनारी फिरत असताना अचानक आलेल्या प्रचंड मोठ्या लाटेमध्ये तीन जण वाहून गेले होते. यामधील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक विद्यार्थी गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. तर या घटनेत मृत पावलेल्या लोकांमध्ये राम विठ्ठल कुटे, वय वर्ष साठ या शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आयुष्य रामटेके 19 वर्षीय विद्यार्थ्यांचा देखील मृत्यू झाला आहे. तर आयुष बोबडे या सतरा वर्ष विद्यार्थ्याला स्थानिकांनी वाचवले असून त्याच्यावरती अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या, मेष ते मीन बाराही राशीभविष्य…

या सहलीसाठी या क्लासेसचे बारा विद्यार्थ्यांनी तीन शिक्षक रायगड जिल्ह्यात गेले होते. पाच नोव्हेंबर रोजी ते अकोल्याहून निघाले तर सात नोव्हेंबरला अलिबाग येथे पोहोचले होते. शनिवारी दुपारी हा गट मुरुड तालुक्यातील काशीद बीचवर गेला होता. त्यावेळी काही जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. त्यात दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक पाण्यात गेले असताना हे दुर्घटना घडली आहे.

Exit mobile version