Two suspects arrested in attempted murder; Local Crime Branch team takes them into custody from Pune : अहिल्यानगरमध्ये खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून अटक केली आहे. आदित्य अंकुश शिरसाठ (वय २२), मंगेश अंकुश शिरसाठ (वय २०, दोघेही रा. शिरसाठवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नावे आहेत.
या प्रकरणाची माहिती अशी की, दिनांक 27/03/2026 रोजी सकाळी 09.15 वा. चे सुमारास आरोपी अंकुश रामा शिरसाठ यास थोडा बाजुला व्हा पलीकडे जाऊ द्या असे फिर्यादी म्हणाल्याचा राग येवुन आरोपीने मंगेश शिरसाठ, आदित्य शिरसाठ, बाळासाहेब रामा शिरसाठ, लक्ष्मण शिरसाठ, संदीप शिरसाठ अशांना बोलावुन घेवुन गैर कायद्याची मंडळी जमवुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कोणतेतरी धारदार शस्त्र, लोखंडी गज, लाकडी दांडके तसेच लाथाबुक्यांनी फिर्यादीस मारहाण करुन गंभीर दुखापत केली आहे.
सदर घटनेबाबत वर नमुद फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोनि किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन त्यांना वर नमुद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना करण्यात आले.
सोशल मीडियावरील आर्थिक सल्ल्यांना नवे नियम; नोंदणीकृत संस्थांना नाव व नोंदणी क्रमांक दाखवणे बंधनकारक
वरील पथकाने गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचे शोध घेत असतांना पथकास व्यवसाय कौशल्याचे आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी सिंहगड पुणे परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने जाधवनगर, वडगाव पुणे येथे जावुन शोध घेतला असता दोन इसम संशयीत फिरत असतांना दिसुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे 1) आदित्य अंकुश शिरसाठ वय-22 वर्षे, 2) मंगेश अंकुश शिरसाठ वय-20 वर्षे दोघे रा. शिरसाठवाडी, ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
त्यांचेकडे वरील गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांने सदरचा गुन्हा त्यांचे इतर साथीदारासह मिळुन केले असल्याची कबुली दिली आहे. ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
