ब्रेकींग! शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार ठरले; बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे शिंदेंच्या उपस्थितीत अर्ज भरणार

Shiv Sena महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान आणि निर्णायक घडामोडी घडत आहेत.

Shiv Sena

Shiv Sena’s Legislative Council candidates announced Bachchu Kadu and Neelam Gorhe file applications in Shinde’s presence : महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान आणि निर्णायक घडामोडी घडत आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी महत्वाचा राजकीय निर्णय घेतला असून ते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार आहेत.

सोशल मीडियावरील आर्थिक सल्ल्यांना नवे नियम; नोंदणीकृत संस्थांना नाव व नोंदणी क्रमांक दाखवणे बंधनकारक

तसेच शिवसेनेकडून निलम गोऱ्हे यांना देखील विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवार ठरले असल्याने चर्चांना पुर्ण विराम मिळाला आहेत. दरम्यान थोड्याच वेळात बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे शिवसेनेचे मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये विधान भवनात अर्ज भरणार आहेत.

प्रहार जनशक्ती पक्ष आता अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात विलीन होणार असला, तरी ‘प्रहार’ ही सामाजिक संघटना स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे. समाजातील वंचित, शेतकरी आणि दिव्यांगांसाठी काम करणारी ही संघटना पूर्वीप्रमाणेच सक्रिय राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरांवर कडू यांची पकड कायम राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतूनच केली होती.

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत काय होणार?, एक्झिट पोल काय सांगतात?

त्यामुळे हा निर्णय त्यांच्या राजकीय घरवापसी म्हणून पाहिला जात आहे. अनेक वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर पुन्हा एकदा ते आपल्या मूळ पक्षात परतत असल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटात प्रवेशानंतर बच्चू कडू यांच्यावर पक्षांतर्गत महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. आगामी काळात संघटन मजबूत करण्यासाठी त्यांना प्रदेशस्तरीय किंवा विशिष्ट विभागाची जबाबदारी दिली जाऊ शकते. इतकेच नव्हे, तर येत्या सहा महिन्यांत होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कडू यांना महत्त्वाचे मंत्रीपद मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

follow us