लोटस, टायगर, लायन जनावरांची नावं माहिती नाही पण हे सर्व डी लिमिटेशनसाठीच… खासदार फुटीवर पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले

Ubt Rebel Mp Ex CM Prithviraj Chavhan ठाकरे गटातील खासदारांच्या भूमिकेबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे

आंबेडकरांमुळेच 2019 ला आमचे 9 खासदार पराभूत, यावेळी त्यांनी...; पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टचं सांगितलं

Prithviraj chavhan

Ubt Rebel Mp Ex CM Prithviraj Chavhan Criticize BJP : राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या भूमिकेबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कराड येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. शिवसेना (उबाठा) गटातील काही खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी पत्र दिल्याच्या चर्चांवर भाष्य करताना चव्हाण यांनी या घडामोडींमुळे पक्षांतर्गत मतभेद स्पष्टपणे समोर येत असल्याचे म्हटले. तसेच देशातील राजकारण एका विशिष्ट दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

नेमंक काय म्हणाले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण?

लोटस, टायगर, लायन ती काय मला जनावरांची नावं माहिती नाहीत, पण शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये फुट पडली आहे. शिवसेनेच्या नऊपैकी सहा खासदारांनी लोकसबा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं आहे. त्यामुळे पक्षामध्ये फुट पडली आहे. नरेंद्र मोदी यांनी हे सर्व लिमिटेशन विधेयकात बदल करून उत्तर भारतीय राज्यांचं वर्चस्व निर्माण करणे आणि महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाचं संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

वेरूळ शिक्षक मृत्यू प्रकरणाला मोठे वळण; PSI नागरगोजे अटकेत, दोन पोलीस कर्मचारी निलंबित, आठ आरोपींवर कारवाई

मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रस्तावित प्रक्रियेबाबत बोलताना चव्हाण यांनी काही राज्यांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. महिला आरक्षणासंदर्भातील निर्णय आणि त्याची अंमलबजावणी यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.देशातील लोकशाही व्यवस्थेवर दबाव वाढत असल्याची चिंता व्यक्त करताना त्यांनी सत्तेचा वापर राजकीय फायद्यासाठी होत असल्याचा आरोप केला. आर्थिक ताकद आणि तपास यंत्रणांच्या भीतीमुळे विरोधी पक्षांतील नेत्यांवर दबाव निर्माण केला जात असल्याचेही ते म्हणाले.

‘पक्ष सोडेल त्या दिवशी राजकारणात राहणार नाही’ 6 खासदारांच्या फुटीनंतर राजाभाऊ वाझे भावूक…

राजकीय पक्षांमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या नेत्यांच्या हालचालींमागे सत्तेचे आकर्षण, आर्थिक हितसंबंध आणि विकासाच्या आश्वासनांचा प्रभाव असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. केंद्र सरकारचे प्रमुख लक्ष्य सत्ता टिकवून ठेवणे असल्याची टीका करत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, शिवसेना (उबाठा) गटातील खासदारांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Exit mobile version