‘पक्ष सोडेल त्या दिवशी राजकारणात राहणार नाही’ 6 खासदारांच्या फुटीनंतर राजाभाऊ वाझे भावूक…
Ubt Rebel Mp Rajabhau Waje खासदारांच्या फुटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
Ubt Rebel Mp Rajabhau Waze turns emotional following the defection of six MPs : शिवसेनेचा वर्धापन दिन अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण चार वर्षांनंतर आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षाला फुटीचं ग्रहण लागलं आहे. यामध्ये ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदारांनी थेट शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली आहे. मात्र यामध्ये तीन खासदार हे अद्यापही उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यात नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा समावेश आहे. खासदारांच्या फुटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पुन्हा माध्यमांशी संवाद साधताना भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाले राजाभाऊ वाझे?
ज्या पक्षातून मी निवडून आलो आहे त्यांच्यासोबत मी ठाम आहे. तसेच हे जे खासदार फुटले आहेत. त्यापैकी कोणीही माझ्याशी बोलले नाही. मी सर्व सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे ते बोलले नसावेत. पुढे बोलत असताना राजाभाऊ वाजे यांना अश्रू अनावर झाले. माझ्या वडिलांना माझा अभिमान वाटत असेल तर त्याच्यापेक्षा आणखी काय हवं आहे. राजकारण किंवा पक्ष म्हणून मी भावूत झालेलो नाही. मी कुटुंबाचा वारसा पुढे चालवत आहे.
पुढे बोलताना वाझे म्हणाले की, त्यांनी राजकारणात जे काही स्थान मिळवले ते पक्षामुळे आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे मिळाले आहे. त्यामुळे पक्षाशी असलेली नाळ कधीही तुटू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या विचारसरणीवर आणि नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे अनेक चर्चा सुरू असल्या तरी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे वाझे यांनी सांगितले. पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट करत, जर कधी अशी वेळ आली तर सक्रिय राजकारणात राहण्यालाही अर्थ उरणार नाही, असे त्यांनी भावनिक शब्दांत म्हटले. राजकीय परिस्थिती बदलत असली तरी कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा आणि पक्ष संघटनेवर विश्वास ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींमुळे विविध स्तरांवर चर्चांना उधाण आले असून राजाभाऊ वाझे यांच्या प्रतिक्रियेकडेही विशेष लक्ष वेधले जात आहे.