UBTs 6 MP join Shivsena Eknath Shinde Special introduced six MP : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटल्यानंतर गेले 2-3 दिवस राज्यामध्ये राजकीय नाट्य सुरू होतं. या नाट्यावर आज अखेर पडदा पडला आहे. कारण आज 22 जून 2026 रोजी अखेर ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांनी शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील वायबी सेंटरमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये खासदारांची खास ओळख करून दिली.
शिंदेंनी सहा खासदारांची करून दिली खास ओळख!
बंडू जाधव हे तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच त्यांना तिकडे प्रेमाने बॉस म्हणतात. कार्यकर्ते आणि जमिनीची घट्ट नळअसणारा हा खासदार आहे.संजय दिना पाटील हा बिंधास्त आणि बेधडक आहे. तसेच दोस्ती-यारीसाठी उत्तम आहे. तो खरा दीनांचा कैवारी आहे. संजय दिना पाटील नाव आहे त्यांचं. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण आहेत.
न्यायालयाचे निर्देश! अल्लू अर्जुन नामपल्ली न्यायालयासमोर व्हर्च्युअल सुनावणीला हजर
ओमराजे मनाचे राजे आहेत. जेव्हा निर्णय घ्यायचा होता, तेव्हा निश्चय केला. बऱ्याच वेळा आम्ही प्रयत्न केले पण त्यांनी निश्चय केला आणि तीन-चार दिवस कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मतदारसंघात विकास आणि काम झाली पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी ते शिवसेनेत आले. काही लोकांनी त्यांना रीलस्टार म्हणून हिणवलं, त्यांच्याकडे होते तेव्हा ते रियल स्टार होते, आता ते रीलस्टार झाले. मात्र ते खरंच रियल स्टार आहेत.
Video : ठाकरे गटातील बंडखोर खासदारांचा शिंदेसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
संजय उत्तमराव देशमुख यवतमाळ वाशिम मतदार संघ मतदार संघाचे खासदार आहेत. ते त्यांचं कामही उत्तम आहे, त्यांच्या वडिलांचे नाव उत्तमराव आहे. त्यांना अधिक उत्तम काम करायचं आहे. म्हणून ते शिवसेनेत आले आहेत. तर आष्टीकर हा बिनधास्त आहे ओपनिंग बॅट्समन तू कुणाच्या आध्यात-मध्यात जात नाही. मात्र त्याच्या वाटेला कोणी केले, तर त्याचं नाव नागेश आहे.भाऊसाहेब वाघचौरे यांच्या नावातच वाघ आहे आणि भाऊ आहे. त्यामुळे लाडकी बहीण राबवणाऱ्यांसोबत भाऊ यायलाच हवा.
