Download App

Uddhav Thackeray : राज्यात भ्रष्टाचाराची साथ, सरकारची CBI चौकशी करा! उद्धव ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray : नांदेड येथील सरकारी रुग्णालयात (Nanded Hospital Deaths) झालेल्या रुग्णांच्या मृत्यू्वरून राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका सुरू केलेली असतानाच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले तसेच रुग्णालयातील बळी हे भ्रष्टाचाराच्या साथीचे बळी आहेत, असा आरोप केला. आम्ही कोरोनाच्या संकटातही माणसांचे जीव वाचवले. मात्र, या सरकारच्या काळातत आरोग्याचे तीनतेरा वाजलेत. कोणतीही साथ नसताना राज्यात भ्रष्टाचाराची साथ आली असे स्पष्ट करत आता राज्य सरकारचीच निपक्षपातीपणे सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

‘गुवाहाटीत टेबलवर नाचायला पैसे पण, औषधांसाठी नाही’; नांदेड मृत्यूप्रकरणी उद्धव ठाकरे संतापले

भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या मोदींना हे मान्य आहे का ?

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील रुग्णालयांतील मृत्यूंवरून संताप व्यक्त केला. या गंभीर घटनांची जबाबदारी कुणीच घेत नसल्याचे पाहून चीड येत असल्याचे ठाकरे म्हणाले. आज कोणतीही साथ नाही फक्त भ्रष्टाचाराची साथ आहे. आरोग्य खात्यात रेट कार्ड ठरवलं जातं. निविदा प्रक्रिया बंद केली आहे. निविदा प्रक्रियेशिवाय औषध खरेदी केली जात असतील तर हे कोणत्या तोंडाने भ्रष्टाचारावर बोलणार. तुम्ही भ्रष्टाचाराचे दार उघडे करून देता. आज जिथे औषध खरेदी पोहोचली नाही. तिकडे कुणाचे दलाल आहेत काय त्याचीही सीबीआय चौकशी करा अशी मागणी ठाकरेंनी केली. विना निविदा जर औषध खरेदी होत असेल तर हे सरळसरळ भ्रष्टाचाराला निमंत्रण देणं आहे. भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या मोदींना हे मान्य आहे का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

त्यावेळी डॉक्टरांच्या ड्युट्या लावल्या होत्या का ?

काही लोकांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्यासाठ चौकशीचा फार्स केला. त्यांना क्लिनचीट दिली. विरोधकांच्या मागे चौकशा लावायच्या आणि स्वतःच्या नेत्यांना मात्र मोकाट रान द्यायचं हे योग्य नाही. आमच्या सरकारच्या काळातही काही जागा रिक्त होत्या. पण, त्याचा त्रास रुग्णांना कधीच होऊ दिला नाही. सलग सुट्ट्या येतात तेव्हा डॉक्टरांच्या ड्युट्या लावून दिल्या जातात. सुट्ट्यांच्या दिवसांत सुट्टी अॅरेंज केली पाहिजे. डॉक्टरांच्या या ड्युट्या लावल्या होत्या का, याचीही चौकशी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

Sanjay Raut : महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, अन् त्यावर.. राऊतांची जळजळीत टीका

follow us