Sanjay Raut : महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, अन् त्यावर.. राऊतांची जळजळीत टीका

Sanjay Raut : महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, अन् त्यावर.. राऊतांची जळजळीत टीका

Sanjay Raut : नक्षलवादाच्या समस्येसंदर्भात राजधानी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सडकून टीका केली. नाव नक्षलवादाचं आहे पण, कारण वेगळं आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याशिवाय राज्यात मागील चार दिवसांत 100 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. हा गंभीर विषय मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ करत नसेल तर मला वाटतं त्यांचं मन आणि हृदय मेलेलं आहे. दिल्लीवाल्यांच्या मन की बात ऐकायला ते येतात पण, नांदेड (Nanded Hospital), संभाजीनगर अनेक जिल्ह्यांत जे मृत्यूचं तांडव सुरू आहे त्यांचा आक्रोश त्यांना ऐकायला जात नाही. महाराष्ट्रात एक यमाचा रेडा फिरतोय त्यावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्वार झालेत, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली.

Sanjay Raut : ‘कुणीही ऐरागैरा उभा राहतो आणि सांगतो’.. राऊतांचा अजितदादांना टोला

खासदार राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूवर सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, नागपूर, नांदेड, संभाजीनगरमध्ये लोक मरण पावल ते औषधांच्या खरेदीतील ठेकेदारीमुळे मरण पावले. कमिशनबाजीमुळे मरण पावले. तिथे ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा घुसणार आहे का? तपास करणार आहे का? मंत्र्याचा तपास करणार आहे का? तुम्ही आम्हाला काय सांगता? असे संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.

आमच्या बाबतीत आयोगाला निकाल फिरवावा लागेल

शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना एकाच निर्णयाच्या आधारावर न्याय मिळेल. आमच्या प्रकरणातही निवडणूक आयोगाला निकाल फिरवावा लागेल. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे की आमदार खासदारांची फूट म्हणजे पक्षातली फूट नाही. हाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला व आम्हालाही लागू होईल. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्था राजकीय दबावाखाली काम करतात. राज्यकर्त्यांना पाहिजे तसे निर्णय देतात. देशाच्या राजकारणाला लागलेली ही कीड आहे, असे राऊत म्हणाले.

Reservation : केंद्राचा मोठा निर्णय; आता कंत्राटी नोकऱ्यांमध्येही मिळणार आरक्षण

कोर्टात जाण्याचा राऊतांचा इशारा

दरम्यान, आता आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्य पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा आहे. यावरही राऊत यांनी टीका केली.  ज्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत त्यांना तुम्ही महासंचालकपदी बसवता मी त्यातला व्हिक्टीम आहे. माझाही फोन टॅप झाला होता. अशा पोलिसांच्या हाती तपास असेल तर काय अपेक्षा करणार असा सवाल करत आपण कोर्टात जाणार असल्याचे राऊत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube