Download App

याला आधी बाहेर काढा! फडणवीसांना ठाकरे असं का म्हणाले?, दरेकरांनी सांगितला AटूZ किस्सा

विधानसभेच्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. दरम्यान, नेत्यांच्या भेटी होत असतात. परंतु, ठाकरे आणि फडणवीस भेट मात्र चर्चेची ठरली आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Uddhav Thackeray meet Devendra Fadnavis : देशात विद्यमान 18 व्या सरकारचं लोकसभेच पहिलं अधिवेश सुरू आहे तर महाराष्ट्रात विद्यमान सरकारचं शेवटचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा पहिलाचं विषय मोठा गाजतोय. (Uddhav Thackeray) त्याच कारण काय तर ऐरवी एकमेकांवर टीकेची झोड उठवणारे भेटले काय आहे लिप्टमधून एकत्र प्रवास झाला काय हे सगळंच चर्चेला निमंत्रण देणार. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या (Ambadas Danve) दालनात सुरुवातीला भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. (Devendra Fadnavis) या दोन्ही नेत्यांमधील भेटीची चर्चा असतानाच कोणालाही अपेक्षित नसलेली आणखी एक घटना घडली. ती विधानभवनाच्या लिफ्टजवळ उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मग काय. या भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे.

उद्धवजी बोलतात तसं नाहीये नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन अमेरिकेतून भारतात परतले; हिंदू राष्ट्राबद्दल केलं मोठं विधान

प्रविण दरेकरांनीही या दोन नेंत्यांसोबत प्रवास केला. त्यावर दरेकर म्हणाले, लिफ्ट सुरु झाल्यानंतर कोणीतरी बोललं, ‘आपण दोघं एकत्र आहात, बरं वाटतं’. त्यावर उद्धवजी माझ्याकडे बोट दाखवून फडणवीसांना म्हणाले, ‘याला पहिले बाहेर काढा’. तेव्हा मी बोललो की, ‘तुमचं अजून समाधान झालं नाही का मी शिवसेनेतून बाहेर जाऊन. माझी बाहेर जायची तयारी आहे. तुम्ही होता का एकत्र? बोलता तसं करा’. त्यानंतर लिफ्टमध्ये हास्यविनोद झाला. उद्धवजी बोलतात तसं नाहीये, त्यांच्या पोटात एक ओठात एक, आम्ही वर गेल्यावर त्यांच्या पोटातील उत्तर मिळालं असा किस्सा दरेकरांनी यावेळी सांगितला.

उद्धवजी बोलतात तसं नाहीये

वर गेल्यावर आम्ही लिफ्टमधून बाहेर पडलो, उद्धव ठाकरे विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. त्यांची मानसिकता विरोधी पक्षात राहायची आहे, ते सत्तेच्या दिशेने आले नाहीत. आम्ही लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर आमचे वेगळे मार्ग दिसून आले आहेत, असंही दरेकरांनी यावेळी म्हटलं आहे. हे दोघं नेते लिफ्टमध्ये प्रवास करत असताना लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे यांचे स्विय साहाय्यक मिलिंद नार्वेकर, प्रविण दरेकर आणि छगन भुजबळ, अनिल परब उपस्थित होते. तळ मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर असा 30 सेकंदाचा प्रवास झाला. त्यामध्ये सर्वच एकमेकांशी मनमोकळ बोलल्याचं दिसून आलं.

पाटलांना दानवेंनी पेढे दिले महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार?, उद्धव ठाकरेंनी थेटच सांगितलं

लिप्टमधील भेटीवर उद्धव ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. “मी आणि देवेंद्रजी यांचा लिफ्ट प्रवास हा योगायोगच आहे. लिफ्टला कान नसतात, त्यामुळे या पुढे गुप्त बैठक तिथेच करू अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान, ठाकरे चंद्रकांत पाटलांच्या भेटीवरही बोलले. म्हणाले, चंद्रकांत पाटील हे भलं मोठं चॉकलेट घेऊन अंबादास दानवेंच्या भेटीला आले होते. परंतु, घोषणा करून असं जनतेला चॉकलेट नका देऊ असा टोला ठाकरेंनी लगावला. दरम्यान, चॉकलेट घेऊन आलेल्या चंद्रकांत पाटलांना अंबादास दानवेंनी पेढे दिले. आमचे 31 खासदार निवडून आलेत, पेढे घ्या, असं अंबादास दानवे म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज