Download App

आम्ही भाजपसोबत पंचवीस वर्षे फुकट घालवली ; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray : आम्ही भाजपसोबत पंचवीस वर्षे फुकट घालवली अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray : आम्ही भाजपसोबत पंचवीस वर्षे फुकट घालवली अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निर्धार मेळाव्यात बोलताना भाजपवर (BJP) केली. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी करत जनशक्ती कायद्यावरुन भाजपवर हल्लाबोल करत शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत आघाडी का केली याचा देखील खुलासा केला आहे.

या मेळाव्यात बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मला प्रश्न पडला की मी डावा आहे की उजवा? पण दोन्ही हात आपलेच आहेत. त्यामुळे डावा आणि उजवा करण्याची गरज नाही. जनशक्ती कायदा किती वाईट आहे आणि या कायद्याचा उपयोग सर्वसामन्यांविरोधात कसा केला जाऊ शकतो? हे जोपर्यंत पटून देणार नाही तोपर्यत उठाव होणार नाही. असं या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपसोबत पंचवीस वर्षे फुकट घालवली

तसेच उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ताधारी काय म्हणतील तुम्ही विरोधक आहात तुम्ही विरोधात बोलणारच पण आम्ही तुमच्या सडलेल्या मानसिकतेविरोधात आहो, देशाच्या किंवा राज्याच्या विरोधात नाही. आम्ही सुद्धा भाजपसोबत 25 ते 30 वर्ष फुकट घालवलीच ना, शरद पवार आणि बाळासाहेब यांचं नातं तुम्हाला माहितीच आहे. मतभेद टोकाचे पण मैत्री त्यापलीकडची, थोडक्यात काय तर त्यांच्यामध्ये मतभेद होते. शिवसेना आणि कम्युनिष्ठांमध्ये देखील प्रचंड संघर्ष झाला पण राजकारणात व्यक्तिगत द्वोष सूड असता कामा नये. म्हणूनच आम्ही शरद पवार, काँग्रेस यांच्यासोबत एकत्र येऊ शकलो कारण सगळ्यांच्या मनात देशप्रेम आहे आणि हा कॉमन धागा होता, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

भव्यदिव्य सेटवर चित्रीत होणार रहस्यमय ‘घबाडकुंड’; दिसणार चमत्कारीक गोष्टी 

तसेच भाजपाने देशाला कोणतेही विचार दिले नाही. स्वतःचे विचार नसल्याने नेहरूरांवर टीका करतात. स्वातंत्र्यात भाजपचा सहभाग नव्हता. अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

follow us