मी सर्वांची माफी मागतो…, उद्धव ठाकरे यवतमाळमध्ये शिंदे अन् फुटीर खासदारांवर भडकले

Uddhav Thackeray : ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसल आहे.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसल आहे. तर ऑपरेशन टायगर 2 राबवत आता आमदार देखील फोडणार असा दावा देखील करण्यात येत असल्याने उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. आजपासून उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. उद्धव ठाकरे फुटीर खासदार संजय देशमुखांच्या यवतमाळ लोकसभा मतदार संघात आयोजित मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांवर जोरदार हल्लाबोल करत यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदारसंघातील जनतेशी माफी मागितली.

या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, पावसाळ्याची सुरुवात झाली असून सडकी पानं गळली आहे आणि नवा कोंब उगवणार आहे. कार्यकर्त्यांचं प्रेम हा माझा पावसाळा आहे. मी मतदारसंघातल्या सर्वांची माफी मागतो कारण या खासदारांनी गद्दारी करुन विश्वासाला काळीमा फासला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल करत ठाकरे म्हणाले की, गद्दार शिरोमणीने फोडाफोड केली आणि 40 आमदार फोडले. संजय देशमुख (Sanjay Deshmukh) गद्दार होता आणि गद्दारांच्या कळुपात गेला असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी खासदार संजय देशमुख यांना लावला. आमदार फोडले, चिन्ह चोरलं तरीही आज शिवसेना आणि ठाकरे उभा आहे. शिवसेना संपली होती तर खासदार फोडण्याची वेळ का आली. मोदीची लाट असताना देखील आम्ही महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आणले असं देखील या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.

विकासनिधीवरुन हल्लाबोल

तर दुसरीकडे या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी विकासनिधीवरुन देखील फुटीर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. विकासनिधीमुळे पक्ष सोडणाऱ्या खासदारांनी दोन वर्षात मतदारसंघात काय केलं? किती आंदोलने केली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांना विचारला. तर दुसरीकडे या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपचा देखील भरपूर समाचार घेतला.  हा भाजप पक्ष नसून आता पाकिस्तान जनता पक्ष होत आहे असं म्हणत भाजपने हिंदूंच्या भावनेशी, हिंदूंशी गद्दारी केली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.  तसेच राममंदिराच्या दानपेटेतील पेसै आणि चांदीच्या विटा चोरल्या जात आहे असंही उद्धव ठाकरे यवतमाळमध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना म्हणाले.

सियाच्या विरोधात ठोस पुरावा नाही म्हणून…, केतन अग्रवाल प्रकरणात नवीन ट्विस्ट; बचाव पक्षाचा मोठा दावा

Exit mobile version