Download App

Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोग आहे की चुना लावणारा आयोग!

  • Written By: Last Updated:

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत जो काही निर्णय दिला आहे. त्यावरून हा केंद्रीय निवडणूक आयोग आहे की चुना लावणारा आयोग, असा प्रश्न पडला आहे. तसेच कितीही मोगॅम्बो आले तरी आम्हाला संपवू शकणार नाही. त्यांना आम्ही पुरून उरु, असा घणाघाती हल्ला पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्यावर केला.

मराठी भाषा दिवस आणि स्थानिय लोकाधिकार समिती सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोमवार (दि. २७) उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा मोगॅम्बो असा उल्लेख करत केंद्रीय निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा तुफान हल्ला केला.

40 गद्दार आमदारांनी आईच्याच पाठीत खंजीर खुपसला; ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांची टीका

उद्धव ठाकरे म्हणाले की, आता ५६ वर्ष होऊन गेली. ३ तारखेला शिवराय संचलन. जिथे मराठी माणसासाठी दरवाजे बंद होते तिथे आज दिमाखात शिवराय संचलन. त्याकाळी मराठीची प्रचंड अव्हेलना होत होती. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या हातात आत्मविश्वासाची तलवार दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मला कोणाहीपुढे झुकायला शिकवले नाही. आज येथे दिवाकर रावते, अरविंद सावंत आजही आहेत. मी संकटात संधी शोधणार आहे. मी अनेक संकट बघत आलोय. १९ जून १९६६ मी लहान होतो तेव्हा सहदेव नाईक पण होते, त्यानंतर त्याला धुमारे फुटले. आणीबाणीच्या काळात जे घडले त्या सगळ्याला शिवसेनाप्रमुखांचा पाठिंबा नव्हता. रावते स्वतः गाडीवर मार्मिक घेऊन जायचे. ही मूळ घट्ट आहे. काही वेळा बांडगुळ छाटावे लागतात. कधी बांडगुळांना वाटत आपणच वृक्ष झालो, अशी एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांवर सडकून टीका केली.

follow us