Video : भोंदूबाबा खरात प्रकरण मिटवण्यासाठी दुसरं प्रकरण.., उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आज पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून सरकार आणि त्यातील मंत्री आमदारांवर टीका केली.

Udhhav Thackeray

Video : भोंदूबाबा खरात प्रकरण मिटवण्यासाठी दुसरं प्रकरण.., उद्धव ठाकरे काय म्हणाले?

महाराष्ट्राच राजकारण आणखी किती खालच्या पातळीवर घेऊन जाणार आहात? (Kharat) महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असताना, जे लोक या कायद्याची अंमलबजावणी करू शकतील तेच जर अशा गोष्टी करत असतील तर अशा भोंदूबाबासहीत त्याच्या भक्तांवरही कारवाई करायला हवी अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॅप्टन खरात प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते आज शनिवार (दि. 21 मार्च)रोजी पत्रकार परिषदेत बोलत होते.

आता या एपस्टिन फाईलवरून कुणाचं लक्षण उडू नये म्हणून राज्यात नवीन विषय सुरू होता कामा नये. आपल्याकडे कायदा आहे. त्याचं कठोरतेने पालन केलं पाहिजे. अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आणि नावे येतात. याचा अर्थ तुम्हाला कळतोय ना. कर्तृत्व शून्य नेते हा मार्ग अवलंबत आहेत असा थेट वार ठाकरे यांनी यावेळी केला.

भोंदू बाबा अशोक खरात ठरला निमित्त, चाकणकरांच्या खुर्चीला सुरुंग नेमका लावला कुणी?

भाकड आणि भोंदू नेते त्यांच्यात कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने काही करू शकत नाही तेच लोक अशा भोंदूबाबांच्या नादी लागले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी पांघरून काढलं पाहिजे. सर्वांच्या पापावर पांघरून घातलं जात आहे. ते खातं त्यांच्याकडे ठेवावं. या निमित्ताने गावाोगावी भोंदू बाबा असतील त्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अगदी ओम फट स्वाहावरही असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

कायद्याचं पालन करणारेच भोंदू बाबाच्या नादी लागणार असतील तर त्यांच्या भोंदू भक्तांवर कारवाई करा. या भक्तांमध्ये राजकारणातील अनेकजण दिसत आहेत. त्यांच्यावर सरळ कारवाई झाली पाहिजे. आम्ही महाराष्ट्राला आधुनिकतेकडं घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे लिंबाच्या लागवडीवर आले आहेत. या लिंबाला टाचण्या मारणं आमचं काम नाही असा टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे.

 

 

Exit mobile version