Uddhav Thackeray Criticize BJP Election Commission : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रॅंडची चर्चा काही थांबायला तयार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एकत्रित विजय मेळाव्यानंतर तर या ब्रॅंडची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. आता सामनाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत शिवसेना (Shivsena) (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे ब्रॅंडवर भाष्य केलं आहे. “हा ब्रॅंड संपवण्यासाठी काहीजण ‘बॅंण्ड’ वाजवत आहेत” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर भाष्य करताना ‘शिवसेना’ नाव दूसऱ्याला दिल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) ‘धोंड्या’ म्हटलंय.
ठाकरे ब्रॅंडबद्दल काय बोलले उद्धव ठाकरे?
सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की, ठाकरे ब्रॅंड हा फक्त ब्रॅंड नाही (BJP) तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची, मराठी माणसाची आणि हिंदू अस्मितेची ओळख आहे. ही ओळख पुसणारे अनेक आले आणि अनेक गेले. परंतू, ठाकरे म्हणजे नेहमीच अनिष्ठाविरूद्ध संघर्ष आहे. आज माझ्याकडे काहीही नाही तरी लोक कुठेही गेले तर अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने स्वागत करतात. जे काही घडतंय त्याबद्दल संताप आणि हळहळ व्यक्त करतात आणि सांगतात की, काहीही झालं तरी आम्ही तुमच्याचसोबत आहोत.
UPSC ‘अपयश’ उघडतंय नव्या संधीचं दार; पीडीएस योजना चर्चेत, कोणत्या वाटा खुल्या?
राजकीय कोंडी करणाऱ्यांवर टिकास्त्र
पक्ष संपविण्यासाठी जे प्रयत्न झाले त्यांवर त्यांना विचारले असता ठाकरे म्हणाले की, ‘हा ब्रॅंड संपवण्यासाठी काहीजण ‘बॅंण्ड’ वाजवत आहेत. याचं कारण त्यांना आपल्याशिवाय कोणतचं नाव नकोय. स्वतःची तुलना जे देवाबरोबर करत आहेत. ते काळाच्या (Maharashtra Politics) ओघात येतात आणि जातात. जे आपल्या परंपरांना मानत नसतील तर परंपराही त्यांना मानणार नाहीत.’ पुढे टिका करताना म्हणाले की, ‘ज्यांच्याकडे काही नाही, जे खऱ्या अर्थाने पोकळ आहेत, त्यांना ठाकरे ब्रॅंडची मदत लागते आहे हेच ठाकरे ब्रॅंडचं वैशिष्ट्य आहे’.
माध्यम-मनोरंजन क्षेत्रासाठी नवा टप्पा: प्रसारभारती अन् राज्य शासनात सामंजस्य करार
शिवसेनाला कोणीही संपवू शकत नाही
पुढे एकनाथ शिंदेंवर टिका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘ज्यांनी पक्षाचे नाव चोरले, चिन्ह चोरले त्यांना स्वतःचा काहीच आदर्श नाही. त्यांनी जनतेला किंवा राज्याला काहीच दिलं नाही. मग ही ब्रॅंडची चोराचोरी करून स्वतःचं महत्त्व वाढविण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, पण लोक त्याला आता भुलणार नाहीत. लोकांचा आमच्यावरील प्रेम आणि विश्वास ते चोरू शकत नाही, हेच त्यांचं दुखणं आहे. जनतेला ते माझ्यापासून तोडू शकत नाहीत. शिवसेनाला कोणीही संपवू शकत नाही’.
शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह यांविषयीच्या निवडणूक आयोगाच्या भुमिकेविषयी त्यांनी आयोगाला ‘धोंड्या’ म्हटलंय. टिका करताना ठाकरे म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाला शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याचा अधिकार आहे, पण शिवसेना हे नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलं आहे. जर उद्या मी निवडणूक आयोगाचं नाव बदलून ‘धोंड्या’ ठेवलं तर चालणार नाही, कारण अधिकार नाही. पक्षाचं चिन्ह कायदेशीर मार्गाने काढून घेण्याचा अधिकार आहे पण नाव काढून घेण्याचा अधिकार नाही. त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत म्हणून हे चाललं आहे. पण शेवटी चोरी ती चोरीच आहे’ असं ठाकरे म्हणाले.