Download App

Uddhav Thackeray : ‘शिवसेना तोडली, राष्ट्रवादीने फोडली अन् मिंध्या लाचारांच्या’.. ठाकरे गटाचा घणाघात

Uddhav Thackeray : ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गटातील (Uddhav Thackeray) आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहेत. शिवसेना फोडल्याचा राग अजूनही ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मनात धुमसत आहे. त्यामुळेच या नेत्यांकडून जहरी टीका केली जात असते. आताही सामनातून पुन्हा एकदा अशीच जळजळीत टीका करण्यात आली आहे. सत्तेचा माज आणि अहंकार रावणाच्या नसानसांत उसळत होता. त्या अहंकाराचा नाश शेवटी दसऱ्याच्या दिवशी झाला. तेव्हापासून विजयादशमीचा उत्सव साजरा होत आहे. घटनाबाह्य अहंकारी रावणाचा नाश होईल या जिद्दीने मराठी जनतेची मने व मनगटे तापली आहेत. शिवतीर्थावर राम लीला साजरी होईल. अहंकारी रावणाचे दहन होईल. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल व भारत देश सूडाच्या फासातून मुक्त होईल. महाराष्ट्राच्या जनतेने अहंकाराचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वाघनखे चढविली आहेत, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

‘गट गद्दारांचा असतो, आमचा तर पक्ष’; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर जहरी टीका

महाराष्ट्राची एकजूट तोडण्याचे काम 2014 पासून सुरू झाले. त्याच कारस्थानाचा भाग म्हणून शिवसेना तोडली गेली. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडला गेला व मिंध्या-लाचार बुळचटांच्या हाती महाराष्ट्र सोपवून भाजपने नवी फडणविशी सुरू केली, अशी टीका या लेखात ठाकरे गटाने केली आहे.

देवेंद्रजी अमली पदार्थांच्या रावणाचा वध करणार का ?

आज महाराष्ट्रात दसरा साजरा होत असताना राज्याची स्थिती काय आहे. श्रीराम नाशकातील पंचवटीत वास्तव्यास होते. रामस्पर्शाने ती भूमी पवित्र झाली पण, त्या पंचवटीत आज राजकीय आशीर्वादाने ड्रग्ज म्हणजे अंमली पदार्थांचा व्यापार चालतो. गेल्या काही महिन्यांपासून पंचवटी या नशेच्या व्यापाराने बदनाम झाली. शेकडो कोटींचे अमली पदार्थ जप्त झाले. हे अमली पदार्थ रामाच्या पंचवटीत आले कुठून. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवरात्रीच्या उत्सवांना गेले व म्हणाले, या देशातील बच्चा बच्चा श्रीराम म्हणेल. देवेंद्रजी, या देशातील बच्चा बच्चा श्रीरामाचा गजर करीलच, त्यासाठी तुमची गरज नाही. पण, अमली पदार्थांचा रावण या तरुणांचा नाश करत आहे. त्या रावणाचा वध तुम्ही करणार आहात का, असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.

Lalit Patil Drugs Case : नाशिकच्या गिरणा नदीत सापडलं कोट्यावधींचं ड्रग्ज! मध्यरात्री पोलिसांची शोधमोहिम

तरुणांच्या हातात रोजगाराऐवजी बिअरची बाटली 

वाढीव उत्पादन शुल्कामुळे म्हणे बिअरचा खप घटला आहे आणि सरकारचा महसूल बुडत आहे. त्यामुळे उत्पादन शुल्कात कपात करून बीअर स्वस्त कशी करता येईल आणि खप कसा वाढवता येईल याचा अभ्यास करण्यासाठी थेट एक अभ्यास गटच मिंधे सरकारने स्थापन केला आहे. तरुणांच्या हातात रोजगाराऐवजी बिअरची बाटली सोपवणारे हे सरकार आहे, अशी टीका या लेखातून ठाकरे गटाने केली आहे.

follow us

वेब स्टोरीज