Udhav Thackeray : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग धरल्याचं दिसून येत आहे. एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांचा जोरदार धडाका सुरु असतानाच आज हिंगोलीत उद्धव ठाकरेंची निर्धार सभा पार पडली. हिंगोलीतल्या रामलीला मैदानात झालेल्या सभेत सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल चढविला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवीन नाव दिलं आहे.
‘पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं केलं पण..,’;ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच संतोष बांगरांना घेरलं
उद्धव ठाकरे म्हणाले, अलीकडच्या काळात मी देवेंद्र फडणवीसांवरच बोलणंच सोडून दिलं आहे. कारण मी एकदा त्यांना फडतूस बोललो पण आता नाही बोलणार, एकदा कलंक बोललो पण आता नाही बोलणार, आता बोलायचं होतं पण आता बोलणार नाही कारण काहीही बोललो तरी बोभाटा होत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
नवाब मलिकांची भूमिका गुलदस्त्यात असतानाच CM शिंदेंनी टाकला डाव; तुकाराम कातेंचा शिवसेनेत प्रवेश
याचवेळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून ‘टरबुज्या’ अशा घोषणा देण्यात आल्या तेव्हा उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करीत टरबुज्याच्या झाडालासुद्धा पाणी लागत असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
नाग उलटा फिरुन डसायला लागला, त्याचा उद्धटपणा चिरडून टाका; उद्धव ठाकरेंचा बांगरांवर हल्लाबोल
तसेच राज्यात दुष्काळ असतानात देवेंद्र फडणवीस जपानला गेले आहेत. राज्याच्या प्रकल्पांसाठी दुष्काळ सोडून देवेंद्र फडणवीस उठले अन् जपानला गेले. देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न स्तुत्य आहे, त्यामुळे मी त्यांना कलंक, फडतूस बोलत नाही, महाविकास आघाडीच्या काळातले प्रकल्प गुजरातला गेले आहेत ते तुम्ही परत आणू शकता का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.