Uddhav Thackeray : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात काल सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांना शेवटची संधी देत 30 ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले. यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा हल्लाबोल सुरू केला आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) याच मुद्द्यावर भाजप, मोदी-शहा आणि नार्वेकर यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. देशात मोदी-शहांनी त्यांचा स्वतंत्र पर्सनल लॉ बनवला असून नार्वेकरांचा लवाद त्याच पर्सनल लॉचा विधानसभा अध्यक्ष पुरस्कार करत आहेत, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.
‘अजित पवारांच्या मुख्यमंत्री करायचे होते की नाही, याचे उत्तर शरद पवारांकडे’
आमदार अपात्रतेबाबत वेळकाढू धोरण स्वीकारून नार्वेकर स्वतःला काय सिद्ध करू इच्छितात असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. विधिमंडळाचे सार्वभौमत्व कायम ठेवणे माझे कर्तव्य असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले हे आश्चर्यच आहे. न्यायालयाने महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्षांवर ट्रायब्युनलची भूमिका सोपवली आहे. अध्यक्ष लवादाच्या भुमिकेत आहेत व ते सुनावणी तसेच निर्णय घेण्यास वेळकाढूपणा करत आहेत. अध्यक्षांच्या या टाइमपास वेब सीरिजवर सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला तरी अध्यक्षांचे तुणतुणे कायम आहे ते म्हणजे मी न्यायालयाचा आदर ठेवीन. योग्य वेळी निर्णय घेईन व विधिमंडळ सार्वभौम आहे. अॅड. नार्वेकर जे तुणतुणे वाजवत आहेत ते तुणतुणे भाजपाने त्यांच्या हातात दिले असून पिंजरा चित्रपटातील मास्तराप्रमाणे ते मंचावर येऊन तुणतुण्याच्या तारा छेडत आहेत, अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे.
नार्वेकर लवादास कायदा कळत नसून ते फक्त जिहादी पद्धतीने वागत आहेत. देश चालवण्याबाबत मोदी-शहांनी त्यांचा स्वतंत्र पर्सनल लॉ बनवला असून नार्वेकरांचा लवाद त्याच पर्सनल लॉ चा विधानसभा अध्यक्ष पुरस्कार करत आहेत. आमदार अपात्रतेबाबत वेळकाढू धोरण स्वीकारून नार्वेकर हे स्वतःला काय सिद्ध करू इच्छितात. महाराष्ट्रात एक समलैंगिक पद्धतीचे सरकार सुरू आहे व सर्वोच्च न्यायालयाने अशा विवाहांना मान्यता दिलेली नाही. ट्रायब्युनलने हे समजून घेतले पाहिजे. अॅड. नार्वेकर हे लवादाच्या भुमिकेत आहेत व त्यांचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून विधिमंडळाचे सार्वभौमत्व जिवंत आहे.
Gopichand Padalkar : एवढा माज, एवढी मस्ती… पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ पुन्हा घसरली