Uddhav Thackeray In Delhi For India Aghadi Meeting : दिल्लीतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर, निवडणूक प्रक्रियेतील गोंधळावर, आणि ‘इंडिया’ आघाडीतील त्यांच्या भूमिकेवर रोखठोक प्रश्न उपस्थित करत आपली स्वतंत्र आणि ठाम भूमिका स्पष्ट केली. आम्ही आमचे (Raj Thackeray) निर्णय घ्यायला सक्षम आहोत. कोणाच्या भूमिकेवर चर्चा करण्याची गरज नाही, असं ठाकरेंनी ठामपणे सांगितलं. इंडिया आघाडीच्या (Maharashtra Politics) बैठकीसाठी ते दिल्लीत आहेत.
उपराष्ट्रपती कुठं आहेत? उद्धव ठाकरेंचा सवाल
उद्धव ठाकरे म्हणाले, इंडिया आघाडीचे (India Aghadi Meeting) नेते पहिल्यांदा भेटत आहेत. उपराष्ट्रपती महोदयांना अचानक तडकाफडकी का काढलं गेलं? सध्या ते कुठं आहेत? यावर चर्चा व्हायला हवी, असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. उपराष्ट्रपतींविषयीच्या या प्रश्नाने उपस्थितांमध्ये खळबळ निर्माण केली.
गडचिरोली हादरलं! व्यायाम करताना सहा तरुणांना ट्रकने चिरडलं, चौघांचा जागीच मृत्यू
बिहारमधील मतदार यादीचा गोंधळ
बिहारच्या मतदार यादीतील गोंधळाकडे लक्ष वेधत उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येकाने आपली ओळख पटवून द्यायची आहे, असं तिथल्या यंत्रणांनी सांगितलं. म्हणजे देशात अघोषित एनआरसी सुरू झालंय का? यावर निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका मांडावी.
आता बीसीसीआयला प्रश्न विचारुच नका, सरकारने कायदाच बदलला; काय घडलं?
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर ठाकरेंचे ताशेरे
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर, व्हीव्हीपॅटची आवश्यकता आणि मतदाराच्या अधिकारासंबंधी गंभीर शंका उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे. मग तुम्ही निवडणुका का घेताय? मतदाराला शेवटपर्यंत कळायला हवं की त्याचं मत जातं कुठं? आता व्हीव्हीपॅट कशाला काढता? ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
राज ठाकरे अन् शिंदे गटावर सडेतोड भाष्य
राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, राज ठाकरे यांच्या भूमिकेवर चर्चा करायची गरज नाही. आम्ही आमची भूमिका स्वतः ठरवायला सक्षम आहोत.एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी घणाघाती टीका केली. गद्दारांच्या मताला मी किंमत देत नाही, अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. इंडिया आघाडीमध्ये ठाकरे बंधू कायम राहणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, अशा काही अटीतटी नाहीत. आमचे निर्णय घ्यायला आम्ही सक्षम आहोत.