मालेगाव : कोविड काळात दोन आव्हान होते. एक धारावी तर दुसरं आव्हान मालेगावच होतं. पण मी घरात बसूनही येथील लोकांच्या मदतीने कोविडवर मात केली आहे. हे मिंध्ये गटाला जमणार आहे का, यांचा कृषीमंत्री शेतकऱ्यांशी कशा पद्धतीने बोलतो ते पहा. या मिंध्ये गटाने पक्षाचं नाव चोरले, धनुष्यबाण चोरले पण माझ्या जिवाभावाची माणसं चोरू शकत नाही. अन्यथा हा जनसागर येथे जमलाच नसता. गेल्यावर्षी एक कांदा ५० खोक्याना विकला गेला, असे म्हणत नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यावरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुफान हल्ला केला.
नाशिकच्या मालेगाव येथील एम. एस. जी महाविद्यालयाच्या प्रांगणात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० अमदारांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली.
K Chandrashekhar Rao यांचे फडणवीसांना चॅलेंज…तर मी महाराष्ट्रात येणार नाही! – Letsupp
कृषीमंत्री अंधारात जाऊन शेतीची पाहणी करत आहे. शेतकऱ्यांशी अब्दुल सत्तार उद्धटपणे बोलतोय. खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी देणारा कृषीमंत्री निर्लज्ज पणे मंत्री म्हणून पदावर बसला आहे. हे यांचे हिंदुत्व आहे, निर्लज्जपणे मुख्यमंत्री “एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा कृषीमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. यापेक्षा महाराष्ट्रासाठी आणखी वाईट काय असू शकते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, कोविड काळात धारावी आणि मालेगावचे मोठे आव्हान होते. हो मी तेव्हा घरात बसून काम केल. पण तुम्ही ते अज्ञापूर्वक पाळलं. ही सर गद्दाराना येऊ शकत नाही. जनतेचे प्रेम गद्दाराच्या नशिबात नाही. तसेच एक कांदा किती खोक्याला गेला आहे. तुमच्या कांद्याला भाव नाही. मात्र, येथील एका ‘कांद्याला’ ५० खोके मिळाले आहेत. म्हणून तो कांदा आपल्याला सोडून गेला आहे. त्या कांद्याला आपल्याला याच मातीत गाडायचे आहे.