Uddhav Thackeray : ‘छातीवर धनुष्यबाण लावतील तेव्हा कपाळावर चोराचा शिक्का असेल’

मुंबई : पक्षाचं नाव चोरलं पण संस्कार चोरता येत नाही. आई-वडील जे लहानपणी संस्कार देतात. ते संस्कार चोरांना मिळालेले नाही. त्यामुळे संस्कार नसणाऱ्यांना चोरीचा माल लागत असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मिंधे गटाचे लोकं उद्या माझ्या घोषणेवरही दावा करतील. धनुष्यबाण चोरलं ते ठिक आहे. पण ठाकरे आडनाव कसे चोरणार आहात. पण तरीही मी […]

Eknath Shinde Uddhav Thackeray

Eknath Shinde Uddhav Thackeray

मुंबई : पक्षाचं नाव चोरलं पण संस्कार चोरता येत नाही. आई-वडील जे लहानपणी संस्कार देतात. ते संस्कार चोरांना मिळालेले नाही. त्यामुळे संस्कार नसणाऱ्यांना चोरीचा माल लागत असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मिंधे गटाचे लोकं उद्या माझ्या घोषणेवरही दावा करतील. धनुष्यबाण चोरलं ते ठिक आहे. पण ठाकरे आडनाव कसे चोरणार आहात. पण तरीही मी घाबरणार नाही. कारण संकटातही मी संधी शोधणारा आहे. तुम्ही चोरलेले धनुष्यबाण घेऊन मैदानात या मी मशाल घेऊन येतो. पण छातीवर धनुष्यबाण लावतील तेव्हा कपाळावर चोराचा शिक्का असेल, असे ठणकावून सांगत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे आणि ४० गद्दार आमदारांवर (MLA) सडकून टीका केली.

मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि ४० गद्दार आमदारांवर घणाघाती टीका केली.

‘त्या’ व्हीपला भीक घालत नाही : भास्कर जाधवांनी गोगावलेंना मोडीत काढले..

उद्धव ठाकरे म्हणाले की, गुडघे टेकायला आणि पालख्या वाहायला मला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेले नाही. ठाकरे म्हणजे मी एकटा नाही. तर समोर बसलेली जनता म्हणजे ठाकरे आहे. पक्ष आणि चिन्ह चोरणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही.

गद्दारांच्या आई-बाप यांनाही वाईट वाटत असेल की आपल्या पोटी काय दिवटा जन्माला आला आहे. जो स्वतःच्या बापाऐवजी दुसऱ्याला आपला बाप म्हणत आहे. म्हणूनच म्हणतो की दुसऱ्याचा बाप चोरणाऱ्या टोळीला स्वतःच्या बापाचे नाव लावायची लाज वाटत आहे. पण एक सांगतो चोरीचा माल जास्त दिवस पचत नाही. एक दिवस त्यांना परतफेड करावीच लागेल, असे देखील उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांना लगावला.

Exit mobile version