मुंबई : कल्याण येथे झालेल्या सभेत एकनाथ शिंदे यांनीच भाजप आपल्याला त्रास देत आहे. त्यामुळे आपण भाजपपासून वेगळे झाले पाहिजे. भाजपचा हा अन्याय उगड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. यासाठी डोळ्यात पाणी आणून भाषण केले होते. मग आता भाजपबरोबर तेच डोळे बंद करून गेला का, आता भाजपबरोबर त्रास होत नाही का, अशी सडकून टीका करत एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत आपल्याला आधीच माहिती होते. मला भेटून जेव्हा हे ४० आमदार जात होते. तेव्हा मी विकले गेलेल्या लोकांपेक्षा लढावू वृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन लढाई लढायची आहे, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या बैठकीत केला.
महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळासाहेब थोरात, सुनील केदार, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या बंडाची कल्पना आपल्याला आधीच होती. मला शिंदेसह ४० आमदार हे विकले गेले आहेत. याची माहिती असल्याने मी कोणालाही थांबवले नाही. कारण मला अशा लोकांना घेऊन लोकशाही वाचवण्याची लढाई लढायची नाही, तर निडर छातीच्या लोकांना घेऊन लढायची आहे. जे कोणत्याही कारवाईला, धमकीला घाबरणार नाही.
भाजपात गेलेली माणसं तिकडे पवित्र झाली की नाही माहिती नाही. पण तेव्हा कल्याण-डोंबिवलीच्या महापालिकेच्या सभेमध्ये याच एकनाथ शिंदे यांनी नाटक केलं होतं. एकनाथ शिंदे हे तेव्हा भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय करतो आहे. अत्याचार करत आहे. हे मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. मग आता तेच डोळे बंद करून भाजपबरोबर गेले आहेत का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करत एकनाथ शिंदे आणि भाजपला झोडपून काढले.