Download App

BBC : छापेमारी कोणत्या लोकशाहीत बसते ? ; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल

मुंबई – बीबीसीच्या (ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस) दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाने (Income Tax Raid on BBC Office) छापेमारी केली. यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. शिवसेनेने (Shivsena) तर या मुद्द्यावर हल्लाबोल केला आहे. बीबीसी (BBC) सारख्या प्रसारमाध्यमावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते ?, असा सवाल करत हे वेळीच रोखले नाही तर देशात हुकुमशाही येण्यास वेळ लागणार नाही, अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, की हुकुमशाहीचा कारभार देशाला पसंत नाही. मात्र, सध्या देशाच्या सत्ताधाऱ्यांचे वर्तन हुकुमशाहीसारखेच आहे. आता या कारभाराविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे आता अनेक जण शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज दिल्ली, मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयात केंद्राय तपास यंत्रणांनी धाड टाकली. विरोधात बातम्या केल्या म्हणून प्रसारमाध्यमांवर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते असा सवाल करत सरकारविरोधात आवाज उठविला तर चिरडून टाकू, असेच केंद्र सरकारचे धोरण आहे.

Ashok Chavhan on Fadnavis : फडणवीसांचा गौप्यस्फोट, चव्हाणांना पवारांवर विश्वास... : LetsUpp Marathi

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीबीसीच्या दिल्ली (Delhi) कार्यालयात ६० ते ७० अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे. बीबीसी कर्मचाऱ्यांना त्यांचे फोन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणालाही आवारात प्रवेश किंवा बाहेर पडण्याची परवानगी नाही. आयकर विभागाकडून हा छापा नसून हे सर्वेक्षण आहे.
आयकर विभागाकडे तक्रार झालेल्या तक्रारीनुसार हे सर्वेक्षण सुरु आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.

Tags

follow us