उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत उपस्थिती किती टक्के? विधिमंडळाची आकडेवारी आली समोर

उद्धव ठाकरे यांची एकूण उपस्थिती ३१.५८ टक्के इतकी होती. राज्याच्या विधिमंडळातून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे.

News Photo   2026 05 17T161404.432

उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या कार्यकाळात १३३ पैकी फक्त ४२ वेळा सभागृहात हजर, विधिमंडळातून अधिकृत आकडेवारी समोर!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी () विधान परिषदेचे सदस्य (आमदार) म्हणून आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात एकूण १३३ पैकी केवळ ४२ सत्रांना हजेरी लावली असल्याचं समोर आलं आहे. त्यांची एकूण उपस्थिती ३१.५८ टक्के इतकी होती. राज्याच्या विधिमंडळातून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे.

एकूण उपस्थिती: ४२ बैठका (१३३ पैकी)अनुपस्थिती: ९१ बैठका
मुख्यमंत्री असताना (२०२० ते २०२२) त्यांच्या उपस्थितीची अधिकृत नोंद उपलब्ध नाही. त्यांचा हा कार्यकाळ १३ मे रोजी संपला.

Exit mobile version