सरकार बदल्यावर त्यातील बरेचसे यांनी डोळ्यादेखत पळवुन नेले. भूमिपुत्रावर अन्याय करणारे बाळासाहेबांचा विचार कसा सांगत आहेत, असा प्रश्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे गटाला विचारला आहे. भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पूर्वीच्या काळी कामगार युनियन तुझी की माझी यावरुन मारामारी होत असे. आता युनियनच्या मारामार्या संपल्या कारण सरकारच युनियन संपवायला लागले. हा पायंडा घातक आहे. सध्या सरकारच अस आहे की कॉन्ट्रॅक्टरचे लाड करायचे आणि प्रसाद खायचा. असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, “प्रत्येकाचे दिवस असतात, आपले दिवस गेलेत अस मी म्हणूच शकत नाही, आणायचेच! त्या वेळेला आपण जो काही प्रसाद देऊ, तो त्यांना आयुष्यभर लक्षात राहिल.”
मुख्यमंत्री साताऱ्यातही ऑनड्युटी; एकाच दिवसांत केला 65 फाईल्सचा निपटारा
आजकाल मोर्चे निघतात, परंतु सरकार संवेदनाशील असायला हवे. युतीचे सरकार असताना शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, मोर्चे येतील परंतु मोर्चे आल्यावर ते पोलिसांकरवी अडवायचे नाहीत, ज्या खात्याबद्दल मोर्चा असेल त्या खात्याचा मंत्री 6 व्या मजल्यावरुन खाली उतरून मोर्चास सामोरा जायला पाहिजे. ही संवेदनाशीलता राहिली कुठे? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अडीच वर्षात 25 मोठे उद्योग आणि अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपण आणत होतो. पण सरकार बदल्यावर त्यातील बरेचसे यांनी डोळ्यादेखत पळवुन नेले, ओरबाडुन नेले, तरी शेपट्या घालुन आत बसणारे बाळासाहेबांचे विचार दाखवत आहेत? हे बाळासाहेबांचे विचार? भूमिपुत्रावर अन्याय करणारे बाळासाहेबांचा विचार कसा सांगत आहेत, असा प्रश्न त्यांनी शिंदे गटाला विचारला.
Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा
राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले की सध्याचे निरुद्योगी मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तैवानच्या कंपनीसोबत एमओयु केला होता, 2300 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार म्हणून फोटो काढले, ती जोडे बनवणारी कंपनी देखील तामिळनाडूत गेली, हे बसलेत जोडे पुसत! फक्त जोडे पुसण्याची लायकी असलेली लोक राज्य करत आहेत, महाराष्ट्राच होणार काय? अशी टीका त्यांनी केली.