Download App

‘सत्तेची खाज आणि चोरीचा माल’; उद्धव ठाकरेंची बॅटिंग, एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Attacks On Eknath Shinde : मी आजही संघर्षात जगतोय. त्यांनी आमचं पक्ष नाव चोरलं, चिन्ह हिसकावलं… पण आमची ओळख, आपली शिवसेना, ती कधीच चोरू शकणार नाहीत,” असं ठाम मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केलं. ज्यांनी पक्ष चोरला, ते आता भाजपात विलीन होण्याच्या वाटेवर आहेत. त्यांच्याकडे दुसरा पर्यायच काय उरलाय असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Eknath Shinde) यांनी सामना दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

नाव चोरता येईल, पण…

ठाकरे म्हणाले, शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा डाव सुरू आहे. चिन्ह गोठवलं जाऊ शकतं, पण ‘शिवसेना’ हे नाव कोणालाच देता येणार नाही. निवडणूक आयोगाला मी ‘धोंड्या’ म्हणतोय, कारण त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने निर्णय ( Uddhav Thackeray’s interview) घेतलाय. संविधान मानत असेल, तर आमचं नाव काढणं शक्यच नाही. धोंड्याला शेंदूर फासणारे आता दिल्लीत बसलेत.

देशभरातील बुद्धिबळपटूंनी गाठले अहिल्यानगर; ‘नरेंद्रजी फिरोदिया चषक’ स्पर्धेची रंगत

सत्ता आणि पैशाची विकृती

सत्तेसाठी जेवढा पैसा आणि बळ वापरत आहेत, ते पाहून उबकायला होतं. एकीकडे लोकशाहीचे ढोल वाजवायचे आणि दुसरीकडे पैशाच्या जोरावर आमदार-खासदार फोडून सत्ता स्थापायची. जर पैशाचाच वापर करायचा असेल, तर निवडणुका का घेताय? थेट खरेदी-विक्री करून (Maharashtra Politics) राज्य बनवा, असा संतप्त सवाल ठाकरे यांनी केला. सत्तेची अशी खाज सुटलीय की, तिच्यावर औषध नाही. सत्तेचं खरं गजकर्ण झालंय, असा घणाघात त्यांनी एकनाथ शिंदेंवर केला.

विधानसभेतील पराभवावर अखेर उद्धव ठाकरे बोलले, थेट मविआवर फोडलं खापर!

दिवटे गेलेले बरे!

पक्षफोडीवर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, कधी कधी साचलेल्या डबक्याला नवं आऊटलेट द्यावं लागतं. अयोग्य माणसं स्वत:हून निघून जातात आणि त्यांच्या जागी नवे, योग्य लोक येतात. जे गेले, ते तिकडे जाऊन काय दिवे लावतातयत, ते सगळ्यांनाच दिसतंय. असे दिवटे गेलेलेच बरे.

follow us