दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही; उद्धव ठाकरेंची भाजपवर आगपाखड

महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असतानाच, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल.

Untitled Design (168)

Untitled Design (168)

Uddhav Thackeray’s scathing criticism of BJP in the backdrop of BMC elections : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असतानाच, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackrey) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘भाजपचा(BJP) वाईट अनुभव आला आहे. त्यामुळे आता काहीही करून भाजपला हरवायचे आहे. महाराष्ट्राच्या(Maharashtra) भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल, पण तुम्ही तुमची निष्ठा विकू नका,’ असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

मुंबईत शिवसेना भवन येथे आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या जनसेवेबाबत माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी मुंबईतील सर्व विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, आमदार आणि खासदारांशी त्यांनी थेट संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी भाजपावर टीका करताना सांगितले की, ‘भाजपाने फक्त युती तोडलेली नाही, तर शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. दोन गुजराती आपल्याला गिळायला निघालेले असताना आपण जर तुझे-माझे करत बसलो, तर लढाई न लढलेलीच बरी. मुंबई आमच्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही.’

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीला बिल्डरकडून दीड कोटी रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले

ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतरही शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरूच आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार असले, तरी वरळी, शिवडी, माहीम, विक्रोळी आणि भांडुप या पाच विधानसभा मतदारसंघांतील पालिका प्रभागांच्या जागांवरून अद्याप तिढा कायम आहे. या जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये नाराजी वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही. आम्ही इतकी वर्षे लढलो आणि मुंबई कोणीही हिसकावून घेऊ शकला नाही. ज्यांना कोणी ओळखत नव्हते, त्या भाजपाला आम्ही खेडोपाडी नेले. आज ज्यांना मोठे केले, तेच आमच्यावर वार करत आहेत. आजपर्यंत भाजपने आपला उपयोग करून घेतला आहे.’यावेळी त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना एकजुटीचा संदेश देत सांगितले की, ‘माझ्यापैकी एकही माणूस फुटता कामा नये. मी सगळा वाईटपणा घ्यायला तयार आहे. तुम्ही तो घेऊ नका. मला मुंबईसह नाशिक, पुणे, ठाणे अशा सर्व ठिकाणी लक्ष द्यायचे आहे. मला 227 लोकांची निवड करायची आहे.’

एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा भाजपला दणका; सोलापुरमध्ये घेतला मोठा निर्णय

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, ‘मुंबईसाठीच्या लढ्यात भाजपा किंवा तत्कालीन जनसंघाचा काडीमात्र संबंध नव्हता. मुंबई गुजरातला हवी होती म्हणून त्यांनी संघर्ष केला. भाजपाने आजवर आपला दुरुपयोग केला आहे. काँग्रेसचाही अनुभव आपण घेतलेला आहे. मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी मनसेशी युती केली आहे. युती किंवा आघाडी असते तेव्हा सगळे काही 100 टक्के आपल्या मनासारखे होत नाही. काही जागा आपल्या हक्काच्या असतात, पण नाईलाजाने त्या सोडाव्या लागतात.’ मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Exit mobile version