अहिल्यानगरमध्ये महायुतीचा निर्णय आज रात्री चर्चे अंती होईल; नगरमध्ये जागावाटापासंदर्भात मंत्री राधाकृष्ण विखेंनी दिली माहिती

महायुतीची भूमिका आज रात्रीपर्यंत स्पष्ट होणार असल्याची अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती.

  • Written By: Published:
Untitled Design (167)

Minister Vikhe gave information regarding land allocation in the city :  राज्यभरात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहताना दिसून येत आहेत. सर्व राजकीय पक्ष निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत 30 डिसेंबर असून देखील अजूनही कोणत्याच पक्षाने जागा वाटपाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान महायुतीतील(Mahayuti) सर्व घटक पक्ष या निवडणुकीसाठी एकत्र येणार का? हा देखील मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे.

शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग; संजय राऊत यांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

दरम्यान महापालिका निवडणुकीत महायुतीची भूमिका आज रात्रीपर्यंत स्पष्ट होणार असल्याचं अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe) यांनी दिली आहे. अहिल्यानगर महापालिकेत 68 जागा असून त्यापैकी 23 जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मागितल्याची माहिती असून त्यामुळे धोरण ठरत नसल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने महायुतीत यावं अशी अपेक्षा व्यक्त करत चर्चेअंती निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे आपण युतीसाठी आशावादी असल्याचं देखील यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

follow us