पवारांचा अंतिम निर्णय बाकी, पण माझ्याकडून महाविकास आघाडीला तडा जाणार नसल्याचं ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु असल्याच्या चर्चांना उधाण असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे.
पुण्यात पतीकडून चारित्र्यावर संशय, हिटरचे चटके देत पत्नीवर अमानुष अत्याचार
ठाकरे म्हणाले, प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापनाचा अधिकार असतो, शरद पवारांनी राजीनाम्याबद्दलचा अद्याप निर्णय अंतिम दिला नाही, त्यांच्या निर्णयानंतरही माझ्याकडून महाविकास आघाडीला तडा जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
शरद पवार आपली भूमिका मांडत आहेत. तो सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. जसा अधिकार नेत्यांचा कार्यकर्त्यांचा असतो तसाच अधिकार कार्यकर्त्यांचाही नेत्यावर असतो. म्हणून कार्यकर्त्यांकडून राजीनामा मागे घेण्याची मागणी करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला व्यवस्थापनाचा अधिकार असतो. अद्याप शरद पवारांचा निर्णय झालेला नाही. त्यावर मी बोलणा असून उद्या 5 मेनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होणारच आहे. पण त्यांच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीला तडा जाणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय.
घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता सुट्ट्यांच्या दिवशी निबंधक कार्यालये सुरू राहणार
शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर काही काळ नेत्यांनी स्तब्धतेची भूमिका घेतली. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते. शरद पवारांच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी उपोषणही केल्याचं पाहायला मिळालंय. दरम्यान, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राजीनाम्याबाबत दोन ते तीन दिवसांत मी अंतिम निर्णय घेणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं.
Sharad Pawar Retirement : पवारांच्या निवृत्तीवर राणेंचं विधान; म्हणाले अजितदादांना…
‘लोकं माझा सांगाती’ या आत्मचरित्रामध्ये उद्धव ठाकरे दोनवेळा मंत्रालयात जात असल्याने ते पसंतीस नसल्याचं पवारांनी लिहिलंय. त्यावरही उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. प्रत्येक व्यक्तीला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार आहे. मी मुख्यमंत्री म्हणून काय काम केलंय, ते जनतेला माहित आहे. मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्यच असल्याने त्यावर मी अधिक बोलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, मी व्यक्तीचा पराभव करायला मागत नसून हुकुमशाही प्रवृत्तीचा मागत आहे, हुकुमशाहीचा पराभव करण्याठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत. तसेच राज्यात सध्या सुरु असलेल्या घडामोडीनंतर माझ्याकडून महाविकास आघाडीला कोणताही तडा जाणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय.