Download App

Udhav Thackery यांच्या स्टेजवर 2024 पर्यंत चार-पाचच लोक दिसतील; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला

Udhav Thackery Criticized by Chandrashekhar Bavankule : उद्धव ठाकरे (Udhav Thackery ) यांना पक्ष चालविण्याची सवय नाही. इतके लोक सोडून गेले, त्यावेळी काही करू शकले नाही. इथून पुढे जे लोक सोडून जातील त्यांना देखील हे थांबवू शकणार नाही. ही क्षमता ठाकरेंकडे नाही पक्ष चालविण्यासाठी 24 तासांतले अठरा तास काम करावं लागतं. तसेच 2024 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या स्टेजवर चार-पाचच लोक दिसतील. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule ) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

‘कामगारांच्या खिचडीचोराला बावनकुळेंचं महत्व कळणार नाहीच’; राणेंचा राऊतांवर घणाघात

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे (Udhav Thackery ) यांच्यावर टीकेसह या पत्रकार परिषदेमध्ये बावनकुळेंनी (Chandrashekhar Bavankule) विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राज्यातील 28 लोकसभा मतदारसंघांमध्ये मी प्रवास सुरू केला आहे. आज यवतमाळ, उद्या अमरावती, परवा भंडारा जिल्ह्यात प्रवास करणार. सप्टेंबरच्या 15 तारखेपर्यंत हा प्रवास सुरू असणार. लोकसभा क्षेत्रातील साडेतीन लाख परिवारांना मोदी सरकारच्या नववर्षाच्या कार्यकाळाचा रिपोर्ट कार्ड आम्ही देत आहोत.

Prakash Raj यांनी केलं ‘विक्रम लँडर’चं तोंडभरून कौतुक! ‘चांद्रयान ३’च्या यशावर म्हणाले…

एका लोकसभा क्षेत्रात 600 सक्रिय पदाधिकारी पुढचे दोन महिने प्रवास करणार आहेत. मी स्वतः घर चलो अभियान करतो आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील तीस हजार कार्यकर्ते 48 लोकसभा क्षेत्रात तीन तास 13 महिने प्रवासाला निघतील. मोदींनी नऊ वर्षात केलेल्या कामाची शिदोरी आमच्याकडे आहे. आम्ही लोकांना कामाचं पत्र देतो तेव्हा मतदार आम्ही मोदींनाच मत देऊ हे ठासून सांगतो याचा आम्हाला अभिमान आहे. मोदींच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात 45 लोकसभेच्या जागा जिंकण्याचा टार्गेट पूर्ण होईल.

यावेळी उद्धव ठाकरेंवर (Udhav Thackery ) टीका करताना बावनकुळे म्हणाले की, घरात बसून जे पक्ष चालवतात ते कोणालाच संपवू शकत नाही. घरात बसूनच पक्ष गेला उद्धव ठाकरे यांना पक्ष चालविण्याची सवय नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, त्याचा दरारा आणि त्यांचाकाम, याचा आम्ही तीस वर्षाचे साक्षी आहोत. इतके लोक सोडून गेले, त्यावेळी काही करू शकले नाही. इथून पुढे जे लोक सोडून जातील त्यांना देखील हे थांबवू शकणार नाही. ही क्षमता उद्धव ठाकरेंकडे नाही पक्ष चालविण्यासाठी 24 तासातले अठरा तास काम करावं लागतं. 24 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या स्टेजवर चार-पाचच लोक दिसतील.

इतर मुद्द्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले…

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर कायद्याचे तज्ञ आहेत. याबाबतीत ते योग्य निर्णय घेतील. तर वेगवेगळ्या भागात बैठक झाल्यावर स्थानिक प्रशासन कामाला लागत. त्याचा त्या विभागाला फायदा होतो. विभागाच्या अजेंड्याला बैठकीचा फायदा होतो. शरद पवार यांची ओबीसी बाबत भूमिका काय आहे? हे सांगण्याची गरज नाही याची गाथा आहे. ओबीसींना नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकार मध्येच न्याय मिळाला. केंद्राची विश्वकर्मा योजना येत आहे. शरद पवार केंद्रात मंत्री होते, राज्यात सरकारमध्ये होते तेव्हा त्यांनी ओबीसी मंत्रालय का सुचविला नाही? शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीबाबत मी या संदर्भात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून शेतकऱ्यांकडून वसुली करू नये शेतकरी अडचणीत आहेत. ज्यांनी बँकेत गैरव्यवहार केला त्यांच्याकडून तो पैसा वसूल करावा अशी मागणी करणार आहे.

Tags

follow us