Download App

Raj-Udhav Thackrey एकत्र येणार? उद्धव ठाकरे म्हणाले, मी, आला तर…

Udhav Thackrey : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेली त्यांना राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मी आला तर… गेला तर.. यावर विचार करत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा मी विचार करतो. त्यामुळे अशा चर्चांना अर्थ नाही. तसं बोलण्याचीही काही आवश्यकता नाही. असं म्हणत त्यांनी मनसेसोबत जाण्याच्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. (Udhav Thackrey break discussion on Alliance with MNS Raj Thackrey)

IND vs WI 1st ODI : भारत-वेस्ट इंडिज आज भिडणार; जाणून घ्या, पिच रिपोर्ट अन् रेकॉर्ड्स

संजय राऊतांचे प्रश्न आणि उद्धव ठाकरेंची उत्तरं…

संजय राऊत – महाराष्ट्राचं राजकारण हे गेल्या काही काळापासून मुलांच्या भोवती नव्हे तर पुतण्यांच्या भोवती फिरताना दिसत आहे.
उद्धव ठाकरे – कोणता पक्ष त्याला अपवाद आहे?

संजय राऊत – पुतण्यांमुले अनेक पक्ष अडचणात आलेत असं वाटत नाही का? राष्ट्रवादीतच दोन पुतणे आहेत. मुंड्यांचे आणि पवारांचे
उद्धव ठाकरे – हो, पण आता हे सगळे पुतणे गेले कुठे? आता सगळे पुतणे कोण गोळा करतय? हे पुतण्यांचं तण.. हे आता सगळे कोणाच्या पारड्यात आहेत? जे घराणेशाहीला विरोध करत आहेत. ते घराणी फोडूनच त्यांना घेत आहेत.

संजय राऊत – त्यातले एक पुतणे तुमचे भाऊ आहेत. मधल्या काळात तुम्ही आणि ते एकत्र येतील अशा चर्चा झाली. त्यावर कोणाची प्रतिक्रिया आली नाही. या चर्चेला कुठे आधार आहे का?
उद्धव ठाकरे – आदार असता तर चर्चा थांबली नसती. आपणच म्हणालात चर्चा झाली आणि थांबली. ज्याने कोणी चर्चा केली त्याला आधार मिलाळा नाही.

संजय राऊत – पण असा एखादा चर्चेचा प्रस्ताव आला तर काय कराल?
उद्धव ठाकरे -मी आला तर… गेला तर.. यावर विचार करत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा मी विचार करतो. त्यामुळे अशा चर्चांना अर्थ नाही. तसं बोलण्याचीही काही आवश्यकता नाही.

शिवसेनेचे बंडखोर दारात आले तर…? उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्टाईलनेच ठणकावलं!

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी आवाज कोणाचा या पॉडकास्टसाठी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग काल बुधवारी आला त्यानंतर या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी भाजपसह अजित पवार गट, शिंदे गटावर घणाघाती टीका केली. तसेच त्यांनी मनसेसोबत जाण्याच्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

Tags

follow us