Ujjwal Nikam On Supreme Court Judgement: राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच राहणार आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी नेमलेला व्हीप हा सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरविला आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही न्यायालयाने फटकारले आहे.
अध्यक्षांना ‘त्या’ आमदारांना अपात्र करावेच लागेल, ठाकरे गटाच्या वकिलांनी सांगितले कारण…
या निकालाचे विश्वेषण करताना ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी सरकार स्थिर आहे. सरकारला सध्या तरी धोका नसल्याचे म्हटले आहे. तरीही राजकीय लढाई मात्र संपलेली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच व्हीप, विधानसभा अध्यक्षाबाबत निकम यांनी मत मांडले आहे.
सत्तासंघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे देवदर्शनाला नगर जिल्ह्यात
शिंदे गटाचे व्हीप भरत गोगावले यांची नियुक्ती न्यायालयाने बेकायदेशीर ठरविले आहे. पक्षात दोन गट पडल्यानंतर व्हीप कोण आहे हे विधानसभेचे अध्यक्ष यांनी ठरविले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्याबाबत निर्णय घेतील. कारण ते बहुमताने विधानसभा अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी किती मुदतीत हा निर्णय घ्यावा हेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
सत्तासंघर्षाच्या ‘सुप्रीम’ निकालानंतर राधाकृष्ण विखेंचा ठाकरेंवर घणाघात
सध्याच्या सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार स्थिर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. परंतु कायदेशीर लढाई मात्र पूर्णपणे थांबलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने नबाम रेबिया खटल्याचा पुनर्विचार करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे हा खटला सात न्यायाधीशांकडे जाणार आहे. त्यामुळे कायदेशीर लढाईच चालू राहील, असे मत निकम यांनी व्यक्त केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताना राज्यपालांमुळे राजीनामा देत असल्याचा उल्लेख राजीनाम्यात केला असता तरी आजचा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला असता. तेच मुख्यमंत्री राहिले असते, असा दावाही निकम यांनी केला आहे.