सत्तासंघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे देवदर्शनाला नगर जिल्ह्यात

  • Written By: Published:
सत्तासंघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे देवदर्शनाला नगर जिल्ह्यात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या दिनांक 12 रोजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिशिंगणापूर व शिर्डी या ठिकाणी ते येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यासंदर्भात शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून सर्वत्र स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. स्वागताची जोरदार तयारी सर्वत्र पाहायला मिळत आहे. उद्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. या निकालानंतर उद्धव ठाकरे प्रथमच उद्या बाहेर पडणार आहेत. यावेळी ते देवाकडे काय मागणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : पिक्चर अभी बाकी है… विधीमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची निवड बेकायदा

उद्धव ठाकरे हे उद्या सकाळी मुंबईहून शिर्डी या ठिकाणी विमानाने येणार आहेत. त्यानंतर ते सोनई या ठिकाणी माजी खासदार यशवंतराव गडाख यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक छोटा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे, त्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी आमदार शंकरराव गडाख, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांसह पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube