Download App

जालन्यात OBC एल्गार! भुजबळ, वडेट्टीवर, पडळकर, देशमुख अन् जानकर एकाच मंचावर

जालना : तब्बल 30 वर्षांनंतर जालना जिल्हा पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू बनला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विरोध करत आज जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार (OBC Reservation) सभेला सुरुवात झाली आहे. या सभेसाठी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय ओबीसी नेते एकवटले आहे. (Under the leadership of minister Chhagan Bhujbal, OBC leaders from all parties united)

आजच्या सभेला भुजबळांच्या नेतृत्वात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, आमदार राजेश राठोड, माजी आमदार आशिष देशमुख, महादेव जानकर, माजी आमदार नारायण मुंढे, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे असे सर्वच दिग्गज जमले आहेत. दरम्यान, यामुळे आगामी काळात राज्यात ओबीसी समजाचे मोठे आंदोलन उभे राहण्याची चिन्ह आहेत. शिवाय ऐन निवडणुकांपूर्वीही शिंदे सरकारला अप्रत्यक्ष इशारा असल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us