‘आम्हाला गृहीत धरू नका’ विधान परिषदेत जागा न मिळाल्याने आठवलेंची तीव्र नाराजी

Union Minister Ramdas Aathvale यांनी देखील त्यांच्या पक्षाला विधान परिषदेत जागा न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Union Minister Ramdas Aathvale

Union Minister Ramdas Aathvale

Union Minister Ramdas Aathvale Angry on BJP Shivsena due to no seat in Legislative council : राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये महायुतीमध्ये जागा वाटपावरून एकमेकांवर असलेली नाराजी उघडपणे दिसून आली. त्यात आता महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी देखील त्यांच्या पक्षाला विधान परिषदेत जागा न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?

आपला RPI पक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे. दिलेला शब्द पाळणे हा माझा स्वभाव असल्यामुळे, माझ्याकडून महायुतीत कधीही दगाफटका होणार नाही. ‘आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत’ पण याचा अर्थ आम्हाला कोणीही गृहीत धरावे असा नाही.

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”mr” dir=”ltr”>आपला RPI पक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे. दिलेला शब्द पाळणे हा माझा स्वभाव असल्यामुळे, माझ्याकडून महायुतीत कधीही दगाफटका होणार नाही. &#39;आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत&#39; पण याचा अर्थ आम्हाला कोणीही गृहीत धरावे असा नाही. विधान परिषदेत…</p>&mdash; Ramdas Athawale (@RamdasAthawale) <a href=”https://x.com/RamdasAthawale/status/2061520450866577437?ref_src=twsrc%5Etfw”>June 1, 2026</a></blockquote> <script async src=”https://platform.x.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

सिंघम स्टाईल अन् आयपीएसची नोकरी सोडून अन्नामलाई भाजपमध्ये कसे आले? जाणून घ्या प्रवास

विधान परिषदेत आम्हाला हक्काची जागा मिळायला हवी होती आणि आता महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये तरी आमच्या या प्रामाणिक निष्ठेचा व मैत्रीचा योग्य तो सन्मान राखला गेलाच पाहिजे.ज्या काळात भाजप-शिवसेनेसोबत इतर कोणतेही नेते आणि पक्ष येत नव्हते, त्या कठीण काळात आपला RPI पक्ष त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला. भाजप-शिवसेनेच्या युतीसोबत जेव्हा आपली RPI ची ताकद जोडली गेली, तेव्हाच खऱ्या अर्थाने या युतीची ‘महायुती’ झाली आहे.

पक्ष चिन्ह हटवलं, अन्नामलाई सोडणार भाजपची साथ? 3 जूनला जाहीर करणार नव्या पक्ष स्थापनेचा निर्णय

आज आपण गरीब आणि शोषित घटकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यशस्वी झालो असून, आपला पक्ष देशभरात वेगाने वाढत आहे. भविष्यात आपल्या पक्षाला कोणीही गृहीत धरू नये आणि सत्तेत आपला हक्क व सन्मान अबाधित राहावा, यासाठी आता RPI च्या सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने व नव्या जोमाने मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version